चर्चा:चीन शत्रु विनाशिनी स्तोत्र
"पाठीवर प्रहार केला दादरचे(??) " म्हणजे काय ? ....ज (चर्चा) १२:१०, १५ ऑगस्ट २०१८ (IST)
@प्रियांका प्रसाद मुजुमदार:प्रस्तुत लेखाचा विषय वरकरणी समजणारा असला तरीही, अशा स्तोत्राविषयी माहिती तिही वैध संदर्भाच्या अभावी, कारण आपण म्हणता ते स्तोत्र लिहिले जरी गेले असेल तरी त्याची विश्वकोशात नोंद का करण्यात यावी हे समजत नाही। सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? ०१:०४, १७ ऑगस्ट २०१८ (IST)
चाीन शत्रु विनाशिनी स्तोत्र
[संपादन]सुरेश खोले महोदय , का करू नये समावेश कृपया स्पष्ट करावे ! प्रियविकी ०९:५४, १७ ऑगस्ट २०१८ (IST) आता अंधश्रद्धा काय आली यात ??
आपल्या माहितीसाठी निम्नोक्त बाबीं खूप महत्त्वाच्या आहेत
[संपादन]- आपण मुख्य पानावरील कोणतीही माहिती कशीही बदलायला मोकळ्या आहात, पण आपण चर्चापानावर लिहिलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मजकूराला हात लावायला नाही, आपण कोणत्याही व्यक्तीच्या सदस्यपानावर आणि चर्चापानावर लिहिलेल्या कोणत्याच मजकूराला न बदलणे हा इथला नियम आहे . आपण ह्या इतिहासामध्ये] ज यांनी मांडलेली शंका आणि माझ्या शंकेमधला साद काढला आहे. जर मला तुम्हांला एखाद्या पानावर हाक मारायची असेल तर मला तुमचे नाव तसेच लिहावे लागते जेणेकरुन आपल्याला मी हाक मारल्याचा संदेश येतो. तो तुम्ही बदलला आहे.
- हा लेख उल्लेखनीयतेच्या कसोटीवर बसत नाही, हे आपण ह्या पानावर पाहू शकता. त्या शिवाय अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहिले जाऊ नयेत असे माझे स्पष्ट मत आहे.
- इतर सदस्यांनी लावलेले साचे शक्यतो आपण काढू नयेत असा संकेत आहे, ते चर्चेनंतर काढले जावेत किंवा प्रचालकांना ते काढू द्यावेत.
- या उपर आपण संदर्भ देऊन जर संस्कृतवरील वर्ग:जानेवारी २०१७ मध्ये वगळावयाचे मराठी विकिस्रोतात स्थानांतरीत लेख इतर ग्रंथांच्या पानांवर काम केल्यास मला खूपच आनंद होईल. विकिस्त्रोत प्रकल्पात स्थलांतरीत केलेल्या स्त्रोतांच्या सगळ्या पानांवर असेच काम करण्याची गरज आहे. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? २३:१४, १७ ऑगस्ट २०१८ (IST)
@प्रियांका प्रसाद मुजुमदार, अभय नातू, आणि V.narsikar: प्रस्तुत लेखावर निर्णय द्यावा ही विनंती, धन्यवाद ! सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? २०:०२, १८ ऑगस्ट २०१८ (IST) महोदय सुरेश खोले आपण यात अंधश्रद्धा कुठे आहे ते सिद्ध करावे . दुसरी गोष्ट अशी की हे स्तोत्र दुर्मिळ असून याचे प्रसिद्ध झाल्याचे संदर्भ मी दिलेले आहेत.ज कोण आहेत ?
माझे मत
[संपादन]या लेखाचा विषय वेगळा आहे आणि कुतुहलप्रेरक आहे. प्रस्तुत लेखात अंधश्रद्धा पसरविणारे काही दिसत नाही. चंडिकेची स्तुती केल्याने भारताचा विजय झाला किंवा न केल्याने पराभव झाला असा कार्यकारण भाव कोठेच दिसत नाही. हा लेख स्तोत्राबद्दलची माहिती देत आहे. मराठी विकिपीडियावर स्तोत्रे व तत्सम काव्यांवर लेख आहेत व असावेतही. त्यातीलच हा एक होतो.
असे असताही या लेखात काही बदल आवश्यक आहेत.
- लेखात दुवे घातले पाहिजेत.
- विषयवस्तू सोडून असलेला मजकूर वगळला पाहिजे किंवा इतरत्र हलविला पाहिजे, उदा - पाक्षिकाच्या किंमतीबद्दलचे विवेचन.
- संदर्भ योग्य त्या साच्याद्वारे दिले पाहिजेत.
थोडक्यात, योग्य ते बदल करुन हा लेख मराठी विकिपीडियावर असावा.
अभय नातू (चर्चा) ०४:२६, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- धन्यवाद, वरील मुद्दे सदर सदस्याने लक्षात घेतले म्हणजे झाले ,सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? ०४:४३, २० ऑगस्ट २०१८ (IST)