Jump to content

चर्चा:गुरू दत्त

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

’गुरुदत्त’चे ’गुरू दत्त ’ करण्याचे प्रयोजन समजले नाही. ’दत्त’ हे ’गुरुदत्त ’च्या वडलांचे नाव नाही की आडनाव नाही. गुरुदत्त, आत्माराम आणि अरुणा ही तीन भावंडे. त्यांचे आडनाव पदुकोण. ’पदुकोण’ हे कुंदापूर गावानजीकचे खेडे. गावची भाषा कोंकणी मिश्रित मराठी. ...J (चर्चा) २२:५२, १० जून २०१३ (IST)[reply]

याचे अगदी नेमके असे उत्तर वसंतकुमार शिवशंकर पदुकोण हेच देऊ शकले असते. परंतु खालील उताऱ्यावरुन कल्पना येईल --

Guru Dutt spent his early childhood in Calcutta (now Kolkata) and he grew close to Bengali culture and intellect. He even adopted the name Guru Dutt, Dutt (more commonly Datta or Dutta) being a common Bengali surname. He was joined by three younger brothers, Atmaram, Devidas and Vijay and a younger sister, Lalitha.

अभय नातू (चर्चा) २२:५७, १० जून २०१३ (IST)[reply]


गुरु दत्त यांच्या पत्नीचे गीता दत्त यांचे माहेरचे आडनाव चौधरी होते असे दिसते. त्या अर्थी त्यांनी दत्त आडनाव स्विकारलेही असू शकते अथवा लोकांनी लावले असू शकते.
वरील बाबीवरून अभय म्हणतात ते बरोबर असण्याची शक्यता आहे.तरीपण इंग्रजी विकिपीडियावरील भारतीय लेखामधील माहितीसही संदर्भांच्या अभावाचा मोठा प्रादुर्भाव आहे. गुरुदत्त यांची आई कन्नड ते बंगाली अनुवाद करत असे असे दिसते. दत्त आडनाव बंगाली प्रभावातून घेतले हा भाग मानला तरी गुरू हा शब्द कसा आला हा प्रश्न वस्तुत: बाकी रहातो. गुरू शब्दाच्या इतर अर्थछटा त्या काळात बहुधा अभिप्रेत नसण्याची सुद्धा शक्यता असू शकते. दक्षीण भारतातील दत्तसंप्रदायाच्या प्रभावातून गुरुदत्त नाव आले नाही या बाबत अधीक नेमका संदर्भ उपलब्ध होऊ शकल्यास बरे.तो पर्यंत बंगाली अख्यायिका खरी मानावी लागेल असे दिसते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:००, १४ जून २०१३ (IST)[reply]

>>..गुरु दत्त यांच्या पत्नीचे गीता दत्त यांचे माहेरचे आडनाव चौधरी होते असे दिसते. <<मग गीता रॉय कोण? ही प्रसिद्ध गायिका गुरुदत्तांची पत्नी होती....J (चर्चा) ००:०६, १५ जून २०१३ (IST)[reply]

गीता घोष रॉय-चौधरी  ;- इति इंग्रजी विकिपीडिया माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:३१, १५ जून २०१३ (IST)[reply]