चर्चा:केप टाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रिबिक[संपादन]

Gnome-edit-redo.svg:,

सर्वप्रथम, या लेखातील शुद्धलेखन सुधारल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही रीबीकचे रिबिक केलेले पाहिले. मूळ डच शुद्धलेखन Riebeeck आहे. याचा उच्चार रीबीक (किंवा काही प्रदेशांत रीबेक) असा होतो. तुम्ही रिबिक करण्यामागची कारणे कळवावी. जर मराठी शुद्धलेखनानुसार इतकेच कारण असेल तर ते पुन्ही रीबीक करावे ही विनंती.

अभय नातू (चर्चा) ११:४८, ५ एप्रिल २०१८ (IST)

मला मूळ स्पेलिंग प्रयत्न करूनही सापडले नव्हतॆ, म्हणून उपान्त्यपूर्व इकार ऱ्हस्व या नियमाने री,बी ऱ्हस्व केले होते, पूर्ववत करीत आहे.... (चर्चा) ११:५९, ५ एप्रिल २०१८ (IST)


डच उच्चार सापडला. रिबीऽक. पहा : [१] ... (चर्चा) १७:२३, ५ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svg:,
शोध घेतल्याबद्दल धन्यवाद.
वरील पानावर Riebeeckचा IPA उच्चार ˈribeːk असा दिला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Help:IPA/Dutch येथे i चा उच्चार deep मधील सारखा आणि eː चा उच्चार made मधील सारखा करावा अशी सूचना आहे.
असे असता रीबेक असे बरोबर आहे असे वाटते.
अभय नातू (चर्चा) २०:४३, ५ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:,

मान्य! रीबेक अशी दुरुस्ती करू? ... (चर्चा) २०:५१, ५ एप्रिल २०१८ (IST)

Yes.png

केले. -- अभय नातू (चर्चा) २०:५६, ५ एप्रिल २०१८ (IST)