चर्चा:उमा आनंद चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

गूगल वर मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्हीतील स्रोतातून उमा चक्रवर्तींबद्दल पुरेसे उल्लेख आढळताहेत बहुधा उल्लेखनीयतेचा प्रश्न असणार नाही म्हणून उल्लेखनीयता साचा काढून चर्चेसाठी चर्चा पानावर घेतला आहे.

वानगी दाखल खालील दोन संदर्भ सध्या नमुद करतो आहे.

Gnome-edit-redo.svgKanchanj:

मला वाटते आपण उमा चक्रवर्तींबद्दल संदर्भासहीत थोडे अधिक लेखन केल्यास उल्लेखनीयतेचा प्रश्न बहुधा राहणार नाही तरी पण उल्लेखनीयतेबद्दल प्रश्न विचारला गेला आहे तेव्हा आपली भूमीका आपण मांडलेली बरी राहील.

आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन आणि वाचन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२८, १२ सप्टेंबर २०१४ (IST)

Gnome-edit-redo.svgMahitgar:

Gnome-edit-redo.svgKanchanj:

ठीक. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरुन सहजपणे माहिती न मिळणाऱ्या व्यक्तींबद्दलचे लेखन सहसा औचित्यभंग करणारे किंवा हितसंघर्ष निर्माण करणारे असते असे दिसते. तरी आपण सुचविल्याप्रमाणे संदर्भ असल्यास खुलासा होईल.
अभय नातू (चर्चा) २२:४३, १२ सप्टेंबर २०१४ (IST)


हम्म्..

१) अकॅडेमीक क्षेत्रातील फोकस्ड कारकीर्द करणाऱ्या मंडळीँच्या प्रभावित वर्तुळाला काही स्वाभाविक मर्यादा पडतात, की ज्यामुळे प्रथमस्तर स्रोतातून अशा मंडळींबद्दल पुरेशा सखोल नोंदी मिळवणे तसेही कठीण जाते, कारण तशी दखलच घेतली गेलेली नसते, व्यवस्थीत नोंदी घेण्याची सवय नसलेल्या आपल्या देशात ते अधिक कठीण जाते. त्या शिवाय नवीन पिढीतील भारतीय पत्रकारीतेच्या दुजोरा आणि पडताळणी करून सखोल व्यासंगी लेखन करण्याचा अभाव आलेला आहे. त्यामुळे साहजीक माहितीत कमतरता जाणवतात.

१ ब) दुसरे असे की उमा चक्रवर्ती तशा मागील पिढीतील आहेत, आणि पर्यायी स्त्रीवादी विचारधारा मांडणाऱ्या असल्यामुळे लोकप्रीयता मर्यादीत वर्तुळापलिकडे फारशी जातही नसेल त्यामुळेही संदर्भनीय उल्लेखांची कमतरता जाणवते. तरीही भारतीय स्टॅंडर्डने भारतीय मिडीयाने सरासरीपेक्षा अधीक दखल घेतलेली असावी असे वाटते. त्यामुळे उल्लेखनीयतेचा मोठा प्रश्न आहे असे वाटत नाही.


२) मला वाटत स्त्री अभ्यास विषयक लेखांना प्रभाव(/वित)लेखनाची छटा येता काही काळ राहील. (मी जसा {{इतिहासलेखन}} तशाच पद्धतीने प्रभावलेखन च्या संदर्भाने मथळा साचा बनवण्याचा विचार येतो आहे ते सावकाश पणे करेन). उमा चक्रवर्ती वयाच्या ७३व्या वर्षी स्त्री अभ्यासकेंद्रांमध्ये किती ॲक्टीव्ह भूमीका निभावत असतील या बद्दल मी साशंक आहे. त्यामुळे हितसंघर्ष किंवा औचित्यभंगाचे मुद्दे नसावेत असे वाटते.

२ब) चक्रवर्ती आणि मेनन या पहिल्या पिढीतील भारतीय स्त्रीवादी अभ्यासक लेखक असल्यामुळे त्यांचे लेखन स्वाभाविक पणे भारतीय विद्यापीठातून अभ्यासक्रमांना अभ्यास आणि संशोधनासाठी लावलेले आहे. चक्रवर्ती आणि मेनन यांचे लेखन निश्चितपणे पुरेसे समसमीक्षीत (पिअर रिव्ह्यूड) असले तरी जास्त करुन त्यांच्याच वर्तुळातून समसमीक्षीत झालेले असण्याची शक्यता अधिक वाटते. त्यामुळे साक्षेपी टिकेचा अभाव काही काळ राहणार. तशात त्यांच्या बद्दलचे लेख, त्यांचे ग्रंथ अभ्यासणारे विद्यापिठीय अभ्यासक/विद्यार्थी विकिपीडियावर लिहिणार तेव्हा साक्षेपी टिकेच्या अभावाने अप्रत्यक्ष प्रभावित राहील अर्थात याला ज्ञानकोशात दखल घेणाऱ्याकडे काय उपाय असेल, तर काहीच नाही कारण आक्षेप आणि टिका उपलब्ध नाहीए तर उपलब्ध नाहीए अशी सध्याची स्थिती राहू शकते. (तशी ती इतरही बऱ्याच लेखांबद्दल असू शकते)

२क) उल्लेखनीयता (आणि किंचीत औचित्याचा - मला वाटते ते विकिपीडिया संकेतांबद्दलच्या अनभिज्ञतेतून झाले असावे) मुद्दा जरासा अनघा तांबे या लेखास जरासा आहे असे वाटते. समकालीन स्त्री अभ्यासक अथवा समकालीन लिंगभाव अभ्यासक असा लेख लिहून त्यात सर्व स्त्रीवादी लेखक लेखिकांची नोंद घेणे जमू शकेल आणि तो स्त्रीवादाबद्दल वाचन/अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना असा एकत्रित लेख उपयूक्त ठरेल म्हणून तसे सूचवावेसे वाटते.

२ड) स्त्री अभ्यासकेंद्राच्या अभ्यासकांना मुख्यत्वे पाठ्यलेखनास उपयूक्त लेखनाकडे कल असेल असे वाटते. त्यांचे प्रत्यक्ष लेखन बघून काही लेखन पाठ्यक्रम सदरात मोडणारे असल्यास कदाचित विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीतही करावे लागू शकेल पण साधारणत: त्यांचे लेखन जसे जसे होईल तसे तसेच ते लक्षात येईल कि त्यातील कोणते विकिपीडियावर अधीक सूट करते आणि कोणते विकिबुक्सवर किंवा विकिस्रोतावर.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१८, १३ सप्टेंबर २०१४ (IST)

लेखशिर्षकाचे लेखन[संपादन]

उमा चक्रवर्ती ह्या त्यांचे नाव तश्याच प्रकारे म्हणजे

उमा चक्रवर्ती असेच लिहितात त्यामुळे ते नाव तसेच असाचे

उमा चक्रवर्ती ह्या स्त्रीवादी लेखीका आहेत. त्यांनी त्यांचे नाव वापरण्यामागे काही राजकीय संदर्भ आहेत. हे माहितगार यांनी विचारात घ्यावे आणि तो लेख पुन्हा आपल्या जागेवर आणावे

उपरोक्त सही न केलेला संदेश प्रथमदर्शनी बहुधा सदस्य:Sureshkhole यांनी लिहिला असावा. अनवधानाने मुख्य लेख नामविश्वात चर्चा चर्चा:उमा आनंद चक्रवर्ती लिहिली गेलेली चर्चा येथे स्थानांतरीत केली.


आपण चांगला प्रश्न विचारला आहेत. मराठी विकिपीडिया शीर्षकलेखन संकेताचे मुख्य दोन भाग आहेत. पहिल्या भागात शीर्षक व्यक्तीच्या पूर्ण नावाने असाव असा संकेत आहे. या संकेतामागच्या उद्देशांची सविस्तर माहिती मी आपणास देईनच पण त्यातील एक मुख्य उद्देश एकाच नावाच्या एक पेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात त्यांच्या बद्दलची माहिती शोधताना आणि लिहिताना गोंधळ होऊ नये म्हणून नावांचे नि:संदिग्धीकरण आहे. ज्ञानकोशाचा वाचक वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी आलेला असतो आणि त्या वाचका समोर कोणतीही माहिती न दडवता प्रस्तुत करणे अभिप्रेत असते.
दुसरा महत्वाचा भाग विभूती पूजा टाळणे अथवा प्रभाव टाळणे या दृष्टीने उपाध्या वगैरे शीर्षक नावात येऊ दिल्या जात नाहीत. ज्ञानकोश उल्लेखनीयता असलेल्यांचीच दखल घेतात पण दखल घेताना विभूतीपूजेला खतपाणी घालणारे कोणतेही विशेषत्व जपत नाहीत. ज्यामुळे साक्षेपी टिकेचा अंतर्भाव करणे सुलभ होते. लेखाचा समतोल जपला जाऊन ज्ञानकोशीय लेखास विश्वासार्हता प्राप्त होते. त्यामुळे शीर्षक लेखन ठरवताना उमा आनंद चक्रवर्ती कोण आहेत त्यांची सामाजिक, राजकीय, वैचारीक पार्श्वभूमी काय आहे हे विचारात घेणे ज्ञानकोशीय संकेतांच्या कसोटीवर अप्रस्तुत आणि अयोग्य ठरते.
अबकड व्यक्ती नाव स्वत: कसे लिहिते हे लक्षात घेताना पूर्ण नाव कसे लिहिते यास निश्चीतपणे महत्व देता येते पण पूर्ण नाव नि:संदिग्धीकरणा साठी महत्वाचेच राहते. उमा आनंद चक्रवर्ती कोणी विशेष सामाजिक, राजकीय, वैचारीक पार्श्वभूमीच्या आहेत म्हणून नव्हे; ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली एक सर्वसाधारण स्त्री म्हणून सर्वच स्त्रीयांच्या नावांची शीर्षके त्यांच्या माहेरच्या आडनावांसहीत ठेवावीत किंवा काय हा एक विचारात घेण्या जोगा प्रश्न असू शकतो.
व्यक्तीगत स्तरावर आपल्या स्त्रीवादी दृष्टीकोण आणि विचारांबद्दल आत्मीयता (सॉफ्ट कॉर्नर) आणि आदर असूनही; हे ज्ञानकोशीय लेखन सकेत स्त्रीकेंद्रीत अथवा पुरुषकेंद्रीत लिंगभावाचा संबंध प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्क्ष विचारात घेऊन बनलेले बनवलेले नाहीत, हे संकेत नि:संदिग्धीकरण आणि विभूतीपुजा टाळणे इत्यादी स्वतंत्र ज्ञानकोशीय कसोट्यांवर बनलेले आहेत असे निश्चितपणे म्हणता येते; निर्णय घेताना विकिपीडिया एक ज्ञानकोश आहे आणि त्याची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्तीने ज्ञानकोशीय संकेतास प्राधान्य असणे स्वाभाविक आहे.
अर्थात वर म्हटल्या प्रमाणे शीर्षक लेखन संकेताची चर्चा करताना उमा आनंद चक्रवर्ती कोणी विशेष सामाजिक, राजकीय, वैचारीक पार्श्वभूमीच्या आहेत म्हणून नव्हे; ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली एक सर्वसाधारण स्त्री म्हणून सर्वच स्त्री विषयक शीर्षक लेखन संकेताचा चर्चात्मक आढावा घेण्यास माझी हरकत नाही. पण या बाबत अधिक तात्विक चर्चा आपल्याला काळाच्या ओघात पुढेही चालू ठेवता येईल. आपण केवळ एका लेखापुरती चर्चा केलीत तर विकिपीडियाची ज्ञानकोश म्हणून पूर्ण आवाका लक्षात घेतला असे होणार नाही. विकिपीडियाची ज्ञानकोशीय आवाका आणि ज्ञानकोशीय संकेतांचे संदर्भ आणि पार्श्वभूमीशी सखोल परिचयासाठी अधीक चर्चेपुर्वी थोडा अधिक कालावधी अभ्यस्त होण्यासाठी जाऊ द्यावात असे वाटते.
आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी/चर्चेसाठी धन्यवाद आणि ज्ञानकोशीय लेखन वाचनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२९, १८ सप्टेंबर २०१४ (IST)

उमाच्या शिर्षकाविषयी[संपादन]

नक्कीच माहितगार

पण पुर्ण नाव लिहीणे हे इंग्रजी विश्वकोषामध्येही तसेच दिसणे आवश्यक आहे ना? परंतू इंग्रजी विश्वकोषावरही अनेक ठिकाणी स्त्रीचे नाव, नवऱ्याचे नाव आणि मग आडनाव शेवटी अश्या स्वरुपात नावे लिहिलेली दिसत नाहीत.

तरीही, आणि माहितीची विश्वकोषीय विश्वासार्हता, त्याला दिलेल्या संदर्भांवरुन लोकांना ठरवू द्यात की, आपण प्रयत्न करितच राहु, आणि शक्य तेव्हढे संदर्भ देऊच.

हो, आपले लिखाण नि:पक्षपाती असावे आणि त्याला कसल्याही राजकारणाचा संसर्ग नसावा असे आपण मानले तरीही, मला वाटत नाही की ज्ञाननिर्मितीचा प्रकल्प हा तुम्ही म्हणालात तसा निराजकिय किंवा, राजकारणाच्या परिघाबाहेर घडतो...

असो हरकत नाही, आपण अश्या चर्चा चालूच ठेऊ. सध्यातरी नावाचा आणि पानाचा मुद्दा हा न विचारात घेता सम्यकरित्या विश्वकोषीय ज्ञाननिर्मितीच्या कामात आपण पुन्हा डोके घालुयात. --श्रीमहाशुन्य (चर्चा) ११:४५, १९ सप्टेंबर २०१४ (IST)मराठी असो अथवा इंग्रजी तिथले तिथले निकष लागणारच असतात काही लेखांवर आधी पाळी येते काही लेखांवर नंतर एवढेच. मी इंग्रजी विकिपीडियावर Legal awareness हा लेख लिहिला तेव्हा जवळपास दर वाक्यागणिक ऑरीजनल रिसर्च असल्याचा आक्शेप घेऊन संदर्भ मागितले गेले, एक एक करून संदर्भ शोधत आणि देत गेलो अजूनही दोन एक देणे बाकी आहेत. तेच Legal education लेख जुना असूनही वाली नसल्या सारखा पडीक होता, काल परवा पासून मी थोडी सुधारणा चालू केली नाहीतर अजून कोणी वाली मिळे पर्यंत तो पडीकच राहणार, मग काळाच्या ओघात कधीतरी सुधारला जाणार. ज्ञानकोश मूळ तत्व तिथेही खूप वेगळे आहे असे नाही. इंग्रजी विकिपीडियावरही ज्ञानकोशाच्या तात्विक बाजू समजून घेऊन विश्लेषण करणाऱ्यांची कमतरताच आहे हे सावकाश पणे जाणवेल.
मराठी विकिपीडियावरही सुरवातीच्या शीर्षक लेखन संकेतांच्या चर्चांमध्ये मी कुठेच नव्हतो. मराठी विकिपीडियावरच्या अंजनी नावाच्या लेखात आमेरीकन लोक केवळ नामसाधर्म्यामुळे येऊन आमेरीकन नृत्यांगनेचे छायाचित्र परत परत लावायला लागले, आणि असेच इतरही नामसाधर्म्याने होणारे घोटाळे अनुभवल्यामुळे पूर्ण नावांची ज्ञानकोशाच्या दृष्टीने प्रॅक्टीकल गरज समजत गेली आहे. उमा चक्रवर्ती इतिहास संशोधक आहेत कोणत्याही इतिहास संशोधकास विचारले तर नामसाधर्म्याने होणाऱ्या एक ना अनेक घोटाळ्यांची माहिती सहज देतील.
दुसरं विभूती पुजकांना नंतर आवरण कठीण जात राहत. शीर्षकाच्या ठिकाणीच विभूती पुजा ज्ञानकोश स्विकारू शकत नाहीत ह्याची अस्पष्ट जाणीव झालेली असली म्हणजे बाकी संपादकीय कात्री सावकाशीने लावली तरीही चालते.
तुम्ही म्हणता तसे कोणताही प्रकल्पावर अंशत: कोणते ना कोणते प्रभाव असू शकतात विकिपिडिया सारखा प्रकल्प चालू करण्या मागे आमेरीकन लोकांचीही काही भूमिका असू शकते. आंतरराष्ट्रीय प्रभाव आपण पुर्ण टाळू शकतोच असे नाही पण चांगले प्रभाव स्विकारतानाच आंतरराष्ट्रीय प्रभावांची अनिष्ट छायाही पडावयास नको किंवा प्रभाव कमीत कमी राहावा म्हणून मराठी विकिपीडियाचा ज्ञानकोशीय परिपेक्ष तात्वीक दृष्ट्या जपतानाच इंग्रजी विकिपीडिया पेक्षा मराठी विकिपीडियाच्या भूमिका बनवण्याच्या स्वांतत्र्या बद्दल होता होईतो सजग असण्याचा माझा तरी सदैव प्रयत्न असतो.
इंग्रजी विकिपीडियात भारतातील लिगल एजूकेशन पद्धतीची काहीच माहिती नसलेली व्यक्ती तुम्ही व्यक्तीगत मत मांडताय ओरीजनल रिसर्च लिहिताय संदर्भ द्या असे म्हणू शकतेच आणि एकुण आमेरीकन युरोपियायी प्रभाव तेथे जाणवतोच तसा मराठी भाषा आणि भारतीय राष्ट्रवादी दृष्टीचा अप्रत्यक्ष प्रभाव मराठी विकिपीडियावर कितीही टाळला तरी येत राहणार हे साहजिक आहे.
ज्ञानकोशावरचे प्रभाव हे पुर्णत: टळणारे नसले तरी प्रभाव टाळण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे राहते. आपण प्रत्येक वेळी वाकत राहीलो तर वाकलेलेच राहू हे टाळण्याच्या दृष्टीने ज्ञानकोशीय अपेक्षांचा बार अधिकाधीक वर ठेवलेला बरे पडते.
असो या विषयांवर अजूनही लिहिण्यासारखे आहे पण तुर्तास आटपते घेतो. जाता जाता, आपण विकिबुक्स हा बंधू प्रकल्प सवडीने अभ्यासावा असे वाटते. स्त्री अभ्यास विषयक टेक्स्ट बुक रायटींग साठी विकिपीडियापेक्षा लेखनासाठी खूप नसले तरीही तुलनेने थोडेसे अधिक स्वांतत्र्य लाभू शकेल आणि विकिपीडियातील लेखांशी मजकुराची देवाण घेवाणही सोपी राहील असे वाटते.
बाकी येत्या काळात प्रसंगोप्पात चर्चा करत राहूच. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४१, १९ सप्टेंबर २०१४ (IST)

उल्लेखनीयता साचा[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, V.narsikar:

  • ह्या पानाला योग्य संदर्भ, विकिडाटा कलम आणि विकिदुवे सर्व असूनही टायविन यांना हा लेख उल्लेखनीय वाटला नसावा त्यामुळे त्यांनी ह्या लेखाला साचा लावला आहे असे मला वाटते.
  • तेव्हा आपण त्यांनाच विचारावे की त्यांना हा लेख का उल्लेखनीय वाटत नाहीये? सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:०४, १७ सप्टेंबर २०१८ (IST)