चर्चा:अशोक मुळ्ये

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात अशोक मुळ्ये यांच्याबद्दल ओझरतीच माहिती असून पुरस्कार व कार्यक्रम यांबद्दलची अधिक माहिती आहे. या लेखाचे शीर्षक बदलावे.

अभय नातू (चर्चा) ०३:२८, २४ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@अभय नातू: मला नेहमीच आश्चर्य वाटते. जिथे जिथे ज यांनी नकल-डकव करुन प्रताधिकार भंग केला आहे त्या प्रत्येक लेखावर आपली संपादने आहेत. पण आपण कधीच हा इतका असंब्ंध्द आणि प्रचारकी थाटात लिहिलेला मजकूर कुठून आला याची शहानिशा केलेली नाहीये? मी जितके ज यांचे लेख प्रताधिकार भंगासाठी पकडले आहेत त्या सर्व लेखांमध्ये ज नंतर आपली संपादने आहेत. इथे ह्या चर्चापानावर उघड दिसते आहे की, आपल्याला मजकूर खटकला पण आपण फ़क्त ते नोंदवले पुढे काहीच नाही. मी ही हे फ़क्त नोंदवत आहे की, हे मला दिसले बाकी हे नोंदवण्या मागे माझा हेतू शून्य आहे. ज यांनी लोकमत मध्ये आलेला लेख जश्याचा तसा उतरवून आणखीन एकदा प्र.अ. भंग केला आहे. WikiSuresh (चर्चा) ०१:०१, १५ जुलै २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole:,
तुम्ही थेट प्रश्न विचारला म्हणून थेट उत्तर देत आहे. हे विचारण्यात तुमच्या मनात किल्मिष नाही हे लक्षात आलेच.
मजकूर कुठून आला याची शहानिशा केलेली नाहीये
तुमचे म्हणणे हे मान्य आहे. याची कारणे -
गेली अनेक वर्षे येथे मी मजकूर नजरेखालून खालण्याचा किल्ला एकांडा लढवत होतो. गेल्या काही महिन्यात तुम्ही, सुबोध, टायवीन, या सगळ्यांचे काम सुरू होई पर्यंत घातलेल्या मजकूराचे अवलोकन करुन ते कमीतकमी निकषांना तरी उतरते कि नाही हे पाहण्याचे काम बव्हंश माझ्याकडेच होते. अर्थात, वेळोवेळी इतरांचा हार लागत होता हे अमान्य करणार नाही परंतु एकंदर संपादने आणि आवाका पाहता हे काम एका माणसाला (किंवा पाच माणसांनाही) उरकणारे नव्हते.
कॉपीव्हायो तुम्ही येथे आणेपर्यंत प्रताधिकारभंग सहजपणे शोधून काढणे कठीण होते (हे काम केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.)
मी आत्तापर्यंत अझ्यूम गुड फेथ या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करीत आलो आहे, अगदी हमरीतुमरीची जुंपलेली असतानाही. असे असता ज यांनी प्रताधिकारभंग केलेला नाही हे गृहित धरुन पुढील कामे केली.
हे सगळे होत असताना काहींनी जाणूनबुजून तर काहींनी अनवधानाने प्रताधिकारभंग चालू ठेवले. हे आता निस्तरणे आले ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आपल्याकडे तेव्हा थोडे अधिक मनुष्यबळ असते तर परिस्थिती वेगळी असती. आता ते आहे म्हणून नेमानेच हे काम होत आहे ही सुदैवाची गोष्ट आहे.
त्या सर्व लेखांमध्ये ज नंतर आपली संपादने आहेत.
रात्र थोडी आणि सोंगे फार असताना समोर दिसणाऱ्या सोंगांना (लेखनऔचित्य, विकिकरणाचे किमान निकष, वर्गवारी, आंतरविकी दुवे, इ.) झोडपताना काही सोंगे अंधारात पळाली. आता ती उजेडात येत आहेत.
अशी संपादने मी करण्यामागे आधीच्या संपादनांना अधिकार बहाल करणे (legitiization) हा हेतू मुळीच नव्हता तर मजकूराला थोडा तरी दर्जा देणे हा होता.
असो. माझ्या या खुलाशानंतरही प्रश्न/शंका असतील तर नक्की विचारावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:१३, १६ जुलै २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:

  • मनुष्यबळ हा प्रश्न सुटत जाईल आता, मला वाटतय पेट्रोलर सारखी जबाबदारी काही लोकांवरती नक्कीच दिली जाऊ शकते. आपल्याकडे अनेक व्यक्ती आनंदाने हे काम करायला तयार होतील.
  • लेजिटीमायझेशनचा प्रश्नच नव्हता, मला हे कळत नव्हते की, एवढ्या संख्येने कसे काय नकल-डकब केली असेल ज आणि इतरांनी. ते ही इतकी वर्षे?
  • असो हरकत, आणखी अनेक गोष्टी यायच्या आहेत, आता सर्व अर्थानी कचरा साफ़ करायला हरकत नाही. आणि गुड फ़ेथच्या पांघरुणाखाली सर्वांच्या घोडचुकाही माफ़ करायची गरज राहिलेली नाही असे मला वाटते. WikiSuresh (चर्चा) ११:२३, १६ जुलै २०१८ (IST)[reply]
@Sureshkhole:,
अझ्यूम गुड फेथ हे पांघरुण नव्हे, हे माझे मार्गदर्शक तत्त्व (Guiding principle) आहे. हे पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही (माझ्यासाठी तरी).
अर्थात, आता मनुष्यबळ वाढल्यामुळे थोडासा चिकित्सक पवित्रा घेता येणे शक्य आहे. आणि कचरा साफ करणे तर आवश्यकच आहे.
अभय नातू (चर्चा) २३:४०, १६ जुलै २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: मला आणखीन काही बाबी प्रकर्षानी करणे आवश्यक वाटत आहे.

  • सध्या साठी काही कामे वाटून देता येतील, जे प्रचालकीय कामातील आणखीन गोष्टी करु शकतील त्यांना संरचनेमध्ये काहीना काही नावांनी/पदांनी सहभागी करुन घेणे.
  • कामाला लागतील तसे अधिकार व्यक्तींना देऊन त्यांना उभे करणे.
  • अनेक जण जबाबदारी दिल्यावरच काम करतात अश्या लोकांना जबाबदारी देणे.
  • नविन सदस्य गटांची निर्मिती ह्या कामासाठी करुन, पेट्रोलर, प्रताधिकार भंग शोधक, अशी खास पदे आणि अधिकार द्यावेत.
  • लेखांची प्रतवारी ठरवावी. थोडक्यात साधे सदस्य आणि प्रचालक यांचा गोंधळ कमी करण्यासाठी अनेक लहान सहान कामे करणारे इतर सदस्य गट जसे इतर विकिंवर आहेत तसे इथेही आण्नावेत.
  • मला सांगा मी काय मदत करु शकतो ह्या सगळ्यात? WikiSuresh (चर्चा) ००:२६, १७ जुलै २०१८ (IST)[reply]
@Sureshkhole:,
पेट्रोलर, प्रताधिकार भंग शोधक ही कामे तुम्ही करीतच आहात तर ती चालू ठेवावी आणि सापडलेल्या खोड्यांची वर्गवारी करावी (हे ही बऱ्याच प्रमाणात तुम्ही करीत आहात.)
लेखांची प्रतवारी ठरवण्यासाठी चर्चा सुरू करावी. यासाठी इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, इ. मोठ्या विकिपीडियांवरील निकषांची पाहणी करुन मराठीला काय लागू पडेल याबद्दल मत द्यावे.
अभय नातू (चर्चा) ०९:१२, १९ जुलै २०१८ (IST)[reply]


@अभय नातू: ह्या गाळण्या सर्वांसाठी खुल्या करण्यात याव्या, या खुल्या झाल्यास सर्वच नविन संपादने प्रताधिकार, संदर्भ, अपशब्द, इ. तपासता येतील. सर्वांसाठी नाही तर निदान जे अर्ज करतील त्यांच्यासाठी तरी, सध्या मला आणि इतर जे सदस्य इच्छूक असतील त्यांना तरी ह्या गाळण्या पाहण्याची मूभा असावी.

@Sureshkhole:,
गाळण्या या सर्वांना संपादनासाठी मुद्दाम खुल्या नाहीत. एखाद्या गाळणीतील बदलाने मोठ्या प्रमाणावर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात. शिवाय गाळण्यावापरून खोडसाळपणा करता येतो हे ही आपल्याला माहिती आहेच.
तरीही मराठी विकिपीडियावरील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी गाळण्या पाहण्यास अपवाद वगळता प्रतिबंध असू नये. या गाळण्या दिसत नसल्यास कळवावे म्हणजे शोध घेता येईल.
गाळण्यामध्ये सुचवलेले योग्य बदल प्रचालकांकडून करुन घेता येतील. तांत्रिक प्रचालकपदात या अधिकार समाविष्ट करता येईल.
अभय नातू (चर्चा) ११:११, १९ जुलै २०१८ (IST)[reply]