चर्चा:अभय आणि राणी बंग
स्वतंत्र उल्लेखनीयतेच्या प्रश्नामुळे हा लेख वगळण्याकरिता नामनिर्देशित झालेला आहे. विकिपीडियावर लेख एकत्र अथवा वेगेवेगळे असू शकतात. अभय बंग यांच्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे तसेच राणी बंग यांच्या बद्दल लेख असू शकतो. त्या शिवाय दोघांचे एकत्रित कार्य खूप असेल सोबतच व्यक्तिगत कार्यही बरेच स्वतंत्र लेखन होण्या एवढे बरेच असेल तर तीन लेखांचाही विचार होऊ शकतो अथवा दोन व्यक्तिंनी सोबत काम केले असेल आणि पुरेशा माहितीचा अभाव असेल तर वेगवेगळे लेख न ठेवता एकाच लेखात दोन व्यक्तिंची माहितीही समाविष्ट करता येते आपले मत लेखाच्या चर्चा पानावर मांडून चर्चेत सहभाग नोंदवावा
या लेखावर आपण येथे चर्चा करू शकतो आभिजीत ०८:१५, १५ जानेवारी २०१२ (UTC)
- लेख ठेवायचाच असेल तर त्याचे मुख्य नाव अभय बंग आणि राणी बंग असे जास्त सयुक्तिक ठरेल.संतोष दहिवळ १७:३७, १५ जानेवारी २०१२ (UTC)
- मला वाटते अभय बंग आणि राणी बंग असे दोन्ही लेख असल्यामुळे अभय आणि राणी बंग अशा लेखाची आवश्यकता नाही. इतर लेख लिहिताना अभय आणि राणी बंग असा दुवा कोणी देणे अवघडच आहे.
- त्यामुळे मी हा लेख वगळलेला आहे. तरी पुनर्स्थापित करावयाचा असल्यास येथे कारणे द्यावीत म्हणजे मी (किंवा इतर प्रचालक) तो पुनर्स्थापित करतील.
- अभय नातू २१:२१, १५ जानेवारी २०१२ (UTC)
- I think that Abhay and Rani Bang is more appropriate as this gives information about their work more accurately.
Mainly they are known for their work which they have done together. So I think that the article can be one. Thanks आभिजीत ०४:१४, १६ जानेवारी २०१२ (UTC)
व्यक्ति स्वतंत्र, कार्य एकत्रित
[संपादन]अभय आणि राणी बंग या नावाचा लेख असणे अनुचित आहे. अभय बंग, राणी बंग अशी वेगवेगळीच पाने असायला हवीत. दोघांचे एकत्रित कार्य एक स्वतंत्र लेख होईल, इतके असेल (आहेच!) आणि ही सर्व माहिती कुणी एकत्रित करुन मांडू इच्छित असेल तर अभय बंग आणि राणी बंग यांचे एकत्रित समाजकार्य अशा स्वरूपाच्या नावाचे पान होऊ शकते, कारण कार्य एकत्रित होऊ शकते परंतू व्यक्ती म्हणून एकत्रित पान असणे योग्य नाही. तसेच दोघांच्याही स्वतंत्र पानांवर एकत्रित कार्याचा थोडक्यात उल्लेख करून कार्याच्या पानाकडे पानाकडे निर्देशित केले जाऊ शकते. - मनोज ०४:३७, १६ जानेवारी २०१२ (UTC)
मूळ पानावरून हलवलेला मजकूर
[संपादन]सुयोग_नाईकवाडे नवे सदस्य आहेत कधी काळी अभिजीत सफाईपण नवे सदस्य नव्हते काय? ते नवे असताना तयार केलेल्या पाना बद्दल बाकी सदस्य चर्चा पानावर सभ्यपणे चर्चा करतात , पण चार दिवस झाले कि एक सदस्य येतो कारण समजावून सांगण्याची तसदी न घेता पानकाढा साचा लावतो आणि जातो, पान काढण्याचे कारण विषद करण्याच्या जबाबदारीची आठवण दिली तर अभिजीत सफाई येतात संबधीत सदस्यास समजेल अशा प्रकारचे कोणतेही विवेचन न करता पानातील मजकुर वगळतात आणि जातात.नवीन सदस्यांना काही किमान कर्टसी दाखवणे नावाची गोष्ट येथे शिल्लक नसणे खेदकारक आहे. अशा प्रकारची वागणूक गैरसमजांना वाव देणारी असू शकते इतरत्र लिहिलेले वाचले ते या मंडळींना वाचावयास मिळत नाही का ?
स्वतंत्र उल्लेखनीयतेच्या प्रश्नामुळे हा लेख वगळण्याकरिता नामनिर्देशित झालेला आहे. विकिपीडियावर लेख एकत्र अथवा वेगेवेगळे असू शकतात. अभय बंग यांच्या बद्दलचा लेख उपलब्ध आहे तसेच राणी बंग यांच्या बद्दल लेख असू शकतो. त्या शिवाय दोघांचे एकत्रित कार्य खूप असेल सोबतच व्यक्तिगत कार्यही बरेच स्वतंत्र लेखन होण्या एवढे बरेच असेल तर तीन लेखांचाही विचार होऊ शकतो अथवा दोन व्यक्तिंनी सोबत काम केले असेल आणि पुरेशा माहितीचा अभाव असेल तर वेगवेगळे लेख न ठेवता एकाच लेखात दोन व्यक्तिंची माहितीही समाविष्ट करता येते आपले मत लेखाच्या चर्चा पानावर मांडून चर्चेत सहभाग नोंदवावा
गैरसमजात वाढ करण्यासारखे वागायचे का गोंधळ वाढवून घ्यायचा हे समजेल एवढी सुज्ञ माणसे इथे शिल्लक नाहीत असे सिद्ध झालेतर,नाईकवाड्यांनी शिट्टी मारलीतर खंडीभर माणस अशा वागणाऱ्यांना सळो की पळो करू लागतील. सुयोग_नाईकवाडे यांनी तयार केलेली पानातील मजकुर मराठी विकिपीडियाच्या नियमात बसत नसेल पण तो नेमक्या कोणत्या नियमात बसत नाही म्हणून वगळला जात आहे याची काही माहिती देण्याची नैतीक जबाबदारी आपली आहे की नाही याचे आत्मपरिक्षण करण्याचे पुन्हा एकदा आव्हान आहे. ते इथे करण्याचे कारण समजण्या एवढे अभिजीत सफाई सुज्ञ असावेत असे वाटते,पान का ? काढा (चर्चा) १८:४२, १ सप्टेंबर २०१२ (IST)