गौरी लंकेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरी लंकेश
गौरी लंकेश
जन्म २९ जानेवारी १९६२ (1962-01-29)
मृत्यू ५ सप्टेंबर २०१७ (वय ५५)

बेंगळुरू, कर्नाटक, भारत
मृत्यूचे कारण बंदुकीच्या गोळ्यांने
ख्याती पत्रकार, कार्यकर्ता


गौरी लंकेश (२९ जानेवारी, १९६२ - ५ सप्टेंबर, २०१७:बंगळूर, कर्नाटक, भारत) ह्या बंगळूरच्या पत्रकार व कार्यकर्त्या होत्या. त्यांनी लंकेश पत्रिकें ह्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले, जे त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केले होते. त्यानंतर त्या गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःचे साप्ताहिक चालवले.[१]

५ सप्टेंबर २०१७ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी राजराजेश्वर नगरातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. मृत्यूपूर्व काळात त्यांनी हिंदु जहालमतवादी लोकांवर टीका केली होती. त्या आधीही गौरी लंकेश यांनी हिंदुत्ववादी आणि जातीयवादी विचारांच्या संघटनाच्या विरुद्ध अनेक प्रकारे लिखाण करून आवाज उठवला होता.[२] त्यामुळे रामचंद्र गुहांसारख्या अनेक राजकीय विश्लेषकांनी गौरी लंकेश यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचे प्रतिपादन केले.[३] गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले, परंतु पुराव्याअभावी काहीही कारवाई करता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला.[४]

गौरी लंकेश यांच्याकडे राज्यकारणातील उजव्या विचारसरणीचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून पाहिले जाते. उदाहरणार्थ, त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीला अनेक पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ देशभरातील संशयास्पद अटकांच्या पार्श्वभूमीवर #IfWeDoNotRise मोहिमेत भाग घेतला.[५]

गौरी लंकेश या अनेकांसाठी प्रेरणा आहेत

2021 मध्ये, बर्नाबी या कॅनडातील एका शहराने ५ सप्टेंबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त "गौरी लंकेश दिन" म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा करण्याचा निर्णय घेतला.[६]

जीवन[संपादन]

गौरी लंकेश यांचा जन्म 29 जानेवारी 1962 रोजी कन्नड लिंगायत कुटुंबात झाला. त्यांचे वडील कवी-पत्रकार पी. लंकेश आहेत, ज्यांनी कन्नड भाषेतील साप्ताहिक लंकेश पत्रिकेची स्थापना केली. त्यांना कविता आणि इंद्रजित ही दोन भावंडे होती.[७]

गौरी यांनी बंगळुरू येथील टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर पती चिदानंद राजघट्टासोबत दिल्लीला राहायला त्या गेल्या. काही काळानंतर, त्या बंगलोरला परतल्यानंतर त्यांनी नऊ वर्षे संडे मासिकाच्या बातमीदार म्हणून काम केले. 2000 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी, त्या दिल्लीतील Eenaduच्या तेलुगू टेलिव्हिजन वाहिनीसाठी काम करत होत्या. तोपर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यातील 16 वर्षे पत्रकार म्हणून घालवली होती.[८]

राजकीय मते आणि विचारसरणी[संपादन]

गौरी या उजव्या विचारसरणीमधील हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर समीक्षक होत्या.[९][१०] 2003 मध्ये, त्यांनी बाबा बुदन गिरी येथे स्थित गुरू दत्तात्रेय बाबा बुदन दर्गाहचे हिंदूकरण करण्याच्या संघ परिवाराच्या कथित प्रयत्नांना विरोध केला.[११] 2012 मध्ये, मंगळुरूमधील जातीय गटांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलनात भाग घेत असताना, त्यांनी सांगितले की हिंदू धर्म हा धर्म नसून "समाजातील पदानुक्रमाची व्यवस्था" आहे ज्यामध्ये "स्त्रियांना द्वितीय श्रेणीतील प्राणी मानले जाते".[१२]

त्यांनी लिंगायत समुदायासाठी अल्पसंख्याक धर्माच्या टॅगचे समर्थन केले आणि कोमू सौहर्दा वेदिकेचे नेतृत्व केले, जे अत्याचारित समुदायांसाठी जातीय सलोखा मंच आहे. तत्त्वज्ञानी बसवण्णा यांचे अनुयायी हिंदू नाहीत, असे तिचे मत होते.[१३]

वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या गौरी यांना ओळखले जाते.[७]

संदर्भ[संपादन]

 1. ^ टीम, एबीपी माझा वेब. "गौरी लंकेश हत्या प्रकरण : रामचंद्र गुहा यांना भाजपची नोटीस". 2018-03-24 रोजी पाहिले.
 2. ^ ahirrao, vishal. "घरासमोरच जवळून गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-09-08. 2018-03-24 रोजी पाहिले.
 3. ^ "ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात गोळ्या घालून हत्या". Loksatta. 2017-09-05. 2018-03-24 रोजी पाहिले.
 4. ^ "गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली". News18 Lokmat. 2018-03-24 रोजी पाहिले.
 5. ^ "#IfWeDoNotRise: Gauri Lankesh's Legacy Lives On". www.globalviews360.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2022-01-31. 2022-01-31 रोजी पाहिले.
 6. ^ "Canadian city to celebrate Gauri Lankesh Day on September 5". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-09-02. 2022-01-31 रोजी पाहिले.
 7. ^ a b "Who is Gauri Lankesh?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-09-06. 2022-03-05 रोजी पाहिले.
 8. ^ "rediff.com: The Rediff Interview/ Gauri Lankesh". www.rediff.com. 2022-03-05 रोजी पाहिले.
 9. ^ "Who is Gauri Lankesh?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-09-06. 2022-03-05 रोजी पाहिले.
 10. ^ Romig, Rollo (2019-03-14). "Railing Against India's Right-Wing Nationalism Was a Calling. It Was Also a Death Sentence" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
 11. ^ "Frontline.in". www.frontline.in. 2022-03-05 रोजी पाहिले.
 12. ^ "Mangalore: Speakers at Komu Souharda Vedike Protest Urge Ban on Communal Outfits". www.daijiworld.com (इंग्रजी भाषेत). 2022-03-05 रोजी पाहिले.
 13. ^ "Gauri Lankesh: Activist Gauri Lankesh shot dead at her Bengaluru home".