प्रेमचंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
प्रेमचंद
Prem chand.jpg
प्रेमचंद
जन्म नाव धनपत राय श्रीवास्तव
टोपणनाव प्रेमचंद
जन्म जुलै ३१, १८८०
लमही, वाराणसी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू ऑक्टोबर ८, १९३६
वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन, पत्रकारिता
भाषा हिंदी
उर्दू
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
कार्यकाळ आधुनिक
विषय सामाजिक
चळवळ प्रगतिशील लेखक आंदोलन
प्रसिद्ध साहित्यकृती गोदान, गबन
वडील मुन्शी अजायबराय
आई आनंदीदेवी
अपत्ये श्रीपत राय, अमृतराय व कमला देवी
स्वाक्षरी प्रेमचंद ह्यांची स्वाक्षरी

मुन्शी प्रेमचंद (जन्म - ३१ जुलै, १८८०, वाराणसी ; मृत्यू - ८ ऑक्टोबर, १९३६) हे हिंदीउर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क'मध्ये ८ ऑक्टोबर १९०३पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

जीवन[संपादन]

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानबवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

इ.स. १९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. इ.स. १९२३ मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस'ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले.

प्रेमचंद हे लेखणीचा शिपाई म्हणून ओळखले जातात.

साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अग्नि समाधि कथासंग्रह हिंदी
असरारे मुआबिद कादंबरी उर्दू
अहंकार अनुवाद हिंदी
कर्मभूमि कादंबरी हिंदी वाणी प्रकाशन १९३२
कायाकल्प कादंबरी हिंदी
कुत्ते की कहानी बालसाहित्य हिंदी
कृष्णा कादंबरी हिंदी
गबन कादंबरी हिंदी
गोदान कादंबरी हिंदी १९३६
चांदी की डिबिया अनुवाद हिंदी
जंगल की कहानियाँ बालसाहित्य हिंदी
तालस्ताय की कहानियाँ अनुवाद हिंदी
दुर्गादास बालसाहित्य हिंदी
नमक का दरोगा कथासंग्रह हिंदी
नवजीवन कथासंग्रह हिंदी
नवनिधि कथासंग्रह हिंदी
निर्मला कादंबरी हिंदी
न्याय अनुवाद हिंदी
पाँच फूल कथासंग्रह हिंदी
पिता के पत्र पुत्री के नाम अनुवाद हिंदी
प्रतापचन्द्र कादंबरी हिंदी डायमंड बुक्स, दिल्ली
प्रतिज्ञा कादंबरी हिंदी
प्रेम चतुर्थी कथासंग्रह हिंदी
प्रेम तीर्थ कथासंग्रह हिंदी
प्रेम द्वादशी कथासंग्रह हिंदी
प्रेम पंचमी कथासंग्रह हिंदी
प्रेम पचीसी कथासंग्रह हिंदी
प्रेम पूर्णिमा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रतिमा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रतिज्ञा कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रमोद कथासंग्रह हिंदी
प्रेम प्रसून कथासंग्रह हिंदी
प्रेमा कादंबरी हिंदी १९०७
प्रेमाश्रम कादंबरी हिंदी
प्रेरणा कथासंग्रह हिंदी
बैंक का दिवाला कथासंग्रह हिंदी
मंगलसूत्र कादंबरी हिंदी
मनमोदक बालसाहित्य हिंदी
महात्मा शेखसादी चरित्र हिंदी
रंगभूमि कादंबरी हिंदी
रामचर्चा बालसाहित्य हिंदी
वरदान कादंबरी हिंदी
शान्ति कथासंग्रह हिंदी
श्यामा कादंबरी हिंदी डायमंड बुक्स, दिल्ली
सप्तसरोज कथासंग्रह हिंदी
सप्त सुमन कथासंग्रह हिंदी
समर यात्रा कथासंग्रह हिंदी
सुखदास अनुवाद हिंदी
सृष्टि का आरम्भ अनुवाद हिंदी
सेवासदन कादंबरी हिंदी
सोजे-वतन कथासंग्रह उर्दू १९०८
स्वराज के फायदे बालसाहित्य हिंदी
हडताल अनुवाद हिंदी
सेवासदन उपन्यास हिंदी
निर्मला उपन्यास हिंदी
गबन उपन्यास हिंदी
गोदान उपन्यास हिंदी
प्रेमाश्रम उपन्यास हिंदी
कर्मभूमी उपन्यास हिंदी