गायत्री जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गायत्री जोशी
जन्म २० मार्च, १९७७ (1977-03-20) (वय: ४७)
नागपूर
इतर नावे गायत्री ओबेरॉय
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४
पती विकास ओबेरॉय

गायत्री जोशी ( २० मार्च १९७७) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. १९९९ सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेमध्ये शेवटच्या पाच स्पर्धकांपैकी एक असलेल्या गायत्रीने आजवर आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस ह्या एकमेव बॉलिवूड चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. २००५ साली लग्न झाल्यानंतर तिने चित्रपट व मॉडेलिंगमधून संन्यास घेतला.

बाह्य दुवे[संपादन]