गर्भावधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

गर्भधारणा झाल्यापासून गर्भ गर्भाशयात वाढत असतो. त्याची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो गर्भाशयातून बाहेर पडतो म्हणजे त्याचा जन्म होतो. गर्भधारणा झाल्यापासून प्राण्याचा जन्म होण्याच्या वेळेपर्यंतच्या काळाला गर्भावधी असे म्हणतात. हा गर्भावधी निरनिराळ्या प्राण्यांमध्ये निरनिराळा असतो. निरनिराळ्या प्राण्यांचे सरासरी गर्भावधी पुढील कोष्टकात दिलेले आहेत.

प्रत्येक प्राण्यामध्ये हा गर्भावधी वेगळा का असावा याचे उत्तर अजून शास्त्रज्ञांना मिळाले नाही. सर्वांत जास्त गर्भावधी – २२ महिने- भारतीय हत्तीमध्ये असतो व सर्वांत कमी व्हर्जिनिया ऑपॉस्सममध्ये- १२ दिवसांचा- असतो.

जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने पाहिले असता प्रत्येक प्राण्याच्या जरूरीप्रमाणे गर्भावधीत बदल होतो. प्राण्यांच्या आकारमानाप्रमाणे त्यांचा गर्भावधी कमी जास्त होतो. लहान सस्तन प्राण्यांत तो कमी असतो व मोठ्या सस्तन प्राण्यांत तो जास्त असतो. परंतु गिनीपिग या नियमास अपवाद आहे. गिनीपिगमध्ये गर्भावधी ६८ दिवसांचा आढळून येतो. सामान्यत: कृंतक (उंदीर, घूस यांसारख्या कुरतडणार्‍या) प्राण्यांत गर्भावधी २० ते ३० दिवसांचा असतो. काही प्राण्यांचा जनन –ऋतू नैसर्गिक रीत्या अशा वेळेला असतो की, ज्यावेळी वर्षातील इतर कोणत्याही ऋतूपेक्षा अन्नधान्य जास्त असते. गर्भावधीच्या अभ्यासाने असेही दिसून येते की, ज्या प्राण्यांना आपली पिल्ले सुरक्षित जागी ठेवता येतात, त्या प्राण्यांत गर्भावधी कमी असतो व पिल्ले अप्रौढ किंवा असाहाय्य अवस्थेत जन्माला येतात; उदा.,  बीळ करून राहणारे काही कृंतक. कांगारूचे पिल्‍लू असाहाय्य व अप्रौढ अवस्थेत जन्माला येते; जन्मानंतर लगेच ते शिशुधानीत  (उदरावरील पिशवीत) ठेवले जाते व त्याची उरलेले वाढ तेथेच होते. याउलट जे प्राणी खुल्या मैदानात, जंगलात किंवा कुरणात राहतात त्यांच्यामध्ये गर्भावधी जास्त असतो व पिल्ले असाहाय्य किंवा अप्रौढ नसतात.


एकाच प्राण्याच्या निरनिराळ्या वेगळ्या गर्भावधीत फरक पडतो. माणसांमध्ये मुलगा जन्माला येणार असेल, तर गर्भावधी मुलीच्या गर्भावधीपेक्षा चार पाच दिवसांनी जास्त असतो. जुळ्या मुलांचा गर्भावधी एका मुलाच्या गर्भावधीहून चारपाच दिवसांनी कमी असतो. आनुवंशिकतेचाही गर्भावधीवर परिणाम होतो. मातापित्यांच्या वयाचा गर्भावधीवर परिणाम होत नाही. संकरांच्या बाबतीत गर्भावधी मातापित्यांच्या दरम्यान असतो. सामान्यत: संकरांचा गर्भावधी मातेच्या गर्भावधीकडे झुकणारा असतो.

गर्भधारणेनंतर ब्‍लास्ट्रला (पेशींच्या एकाच स्तराची भित्ती असलेली पाण्याने भरलेली पोकळी ) तयार होतो. हा ब्‍लास्ट्रला अनेक दिवस सुप्तावस्थेत राहतो व नंतर काही दिवसांनी परत  त्याची वाढ होते. त्यामुळे गर्भाची खरी वाढ जितके दिवस होते त्यापेक्षा ती  अधिक दिवस झाल्यासारखी वाटते, उदा., यूरोपियन बॅजर.

काही कृंतक प्राण्यांमध्ये काही वेळेला गर्भावधीत वाढ झाल्याचे आढळून येते. उंदरामध्ये गर्भावधी २१ दिवसांचा असतो. ज्यावेळी पिल्ले मातेचे दूध पीत असतात त्यावेळी गर्भधारणा झाल्यास गर्भावधी तीसचाळीस दिवसांचा होतो.