गजेंद्र अहिरे
Appearance
(गजेंद्र अहीरे या पानावरून पुनर्निर्देशित)
filmmaker | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी १६, इ.स. १९६९ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
गजेंद्र विठ्ठल अहिरे (जन्म १६ फेब्रुवारी १९६९[१]) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि कवी आहेत. मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र त्यांच्या पत्नी आहेत.
जीवन
[संपादन]गजेंद्र अहिरे यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले.
कारकीर्द
[संपादन]गजेंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.
चित्रपट
[संपादन]चित्रपटाचे नाव | वर्ष | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
अनवट | इ.स. २०१४ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
अनुमती | इ.स. २०१३ | मराठी | कथा, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन |
वासुदेव बळवंत फडके | इ.स. २००७ | मराठी | संवाद, दिग्दर्शन |
गुलमोहर | इ.स.२००९ | मराठी | दिग्दर्शन |
टूरिंग टॉकीज | इ.स. २०१३ | मराठी | दिग्दर्शन |
दिवसेन् दिवस | इ.स.२००६ | मराठी | कथा, पटकथा, दिग्दर्शन |
नॉट ओन्ली मिसेस राऊत | इ.स. २००३ | मराठी | दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संपादन |
नातीगोती | इ.स. २००६ | मराठी | संपादन, दिग्दर्शन |
निळकंठ मास्तर | इ.स. २०१५ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
पारध | इ.स.२०१० | मराठी | दिग्दर्शन |
पिपाणी | इ.स. २०१२ | मराठी | दिग्दर्शन |
पोस्ट कार्ड | इ.स. २०१४ | मराठी | पटकथा, दिग्दर्शन |
बायो | इ.स. २००६ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
मायबाप | इ.स. २००७ | मराठी | दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद |
विठ्ठल विठ्ठल | इ.स. २००३ | मराठी | निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद |
शासन शासन | इ.स. २०१६ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
शेवरी | इ.स.२००६ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
समुद्र | इ.स.२०१० | मराठी | कथा, दिग्दर्शन |
सरीवर सरी | इ.स. २००५ | मराठी | दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद |
दि सायलेन्स | इ.स. २०१५ | मराठी | दिग्दर्शन |
सुंबरान | इ.स.२००९ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
सैल | इ.स.२००६ | मराठी | कथा, दिग्दर्शन |
स्वामी पब्लिक लि. | इ.स. २०१४ | मराठी | दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद |
हॅलो जयहिंद | इ.स. २०११ | मराठी | दिग्दर्शन |
गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली चित्रपट गीते
[संपादन]- ओंजळीत माझ्या माझे उसासे (गायिका - साधना सरगम, संगीत - भास्कर चंदावरकर, चित्रपट - सरीवर सरी)
- कंठ आणि आभाळ दाटून (गायक शंकर महादेवन, हरिहरन, संगीत - भास्कर चंदावरकर, चित्रपट - सरीवर सरी)
- झाले मोकळे आकाश (गायिका - बेला शेंडे, सावनी शेंडे; संगीत - अभिराम मोडक; झी मराठीवरील दूरचित्रवाणी मालिकेचे शीर्षक गीत)
- सांज झाली तरी माथ्यावरी (गायिका - साधना सरगम, संगीत - भास्कर चंदावरकर, स्वराविष्कार - हरिहरन, चित्रपट - सरीवर सरी)
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ ठाकूर,दिलीप. "श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे".[permanent dead link]
बाह्य दुवे
[संपादन]- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-10 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गजेंद्र अहिरे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |