वृंदा गजेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वृंदा गजेंद्र अर्थात वृंदा गजेंद्र अहिरे (१५ सप्टेंबर, इ.स. १९७५[१] - हयात), पूर्वाश्रमीची वृंदा पेडणेकर, ही मराठी अभिनेत्री आहे. हिने मराठी चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी चित्रपटदिग्दर्शक गजेंद्र अहिरे हिचा पती आहे.

जीवन[संपादन]

वृंदा गजेंद्र हिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयात झाले. रुईया महाविद्यालयात असताना गजेंद्र अहिरे लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात तिने अभिनय केला होता. त्या वेळेस ती इयत्ता अकरावीत शिकत होती. नाटकाच्या वेळी तिची गजेंद्राशी ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले [१].

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

चित्रपटाचे नाव वर्ष भाषा सहभाग
पांढर मराठी अभिनय
पारध इ.स. २०१० मराठी अभिनय

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b ठाकूर,दिलीप. "श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे".[permanent dead link]