Jump to content

ख्मेर राजवंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ख्मेर राजवंश हा आग्नेय आशियातील ख्मेर साम्राज्यावर इ.स.च्या नवव्या ते पंधराव्या शतकांत राज्य करणारा राजवंश होता. मुख्यत्वे हिंदू धर्मीय असलेल्या या राजांनी नंतर बौद्ध धर्म अंगिकारला.

साधारण कंबोडिया, थायलंड व आसपासच्या प्रदेशात सत्ता असलेले हे राजे स्वतःस देवराजे म्हणवून घेत.

राजे[संपादन]

राजा राजा इतर नावे राज्यकाल
जयवर्मन दुसरा जयवर्मन इ.स. ८०२-इ.स. ८५०
जयवर्मन तिसरा जयवर्धन इ.स. ८५०इ.स. ८७७
इंद्रवर्मन पहिला इंद्रवर्मन इ.स. ८७७इ.स. ८८९
यशोवर्मन पहिला यशोवर्धन इ.स. ८८९इ.स. ९००
हर्षवर्मन पहिला हर्षवर्मन इ.स. ९००इ.स. ९२५
इशानवर्मन दुसरा इशानवर्मन इ.स. ९२५इ.स. ९२८
जयवर्मन चौथा जयवर्मन इ.स. ९२८इ.स. ९४१
हर्षवर्मन दुसरा हर्षवर्मन इ.स. ९४१इ.स. ९४४
राजेद्रवर्मन दुसरा राजेद्रवर्मन इ.स. ९४४इ.स. ९६८
१० जयवर्मन पाचवा जयवर्मन इ.स. ९६८इ.स. १००१
११ उदयादित्यवर्मन पहिला उदयादित्यवर्मन इ.स. १००२
१२ जयविरहवर्मन जयविरहवर्मन इ.स. १००२इ.स. १००६
१३ सूर्यवर्मन पहिला सूर्यवर्मन इ.स. १००६इ.स. १०५०
१४ उदयादित्यवर्मन दुसरा उदयादित्यवर्मन इ.स. १०५०इ.स. १०६६
१५ हर्षवर्मन तिसरा हर्षवर्मन इ.स. १०६६इ.स. १०८०
१६ नृपतिंद्रवर्मन नृपतिंद्रवर्मन इ.स. १०८०इ.स. १११३
१७ जयवर्मन सहावा जयवर्मन इ.स. १०८०इ.स. ११०७
१८ धारणेंद्रवर्मन पहिला धारणेंद्रवर्मन इ.स. ११०७इ.स. १११३
१९ सूर्यवर्मन दुसरा सूर्यवर्मन इ.स. १११३इ.स. ११५०
२० धारणेंद्रवर्मन दुसरा धारणेंद्रवर्मन इ.स. ११५०इ.स. ११५६
२१ यशोवर्मन दुसरा यशोवर्मन इ.स. ११५६इ.स. ११६५
२२ त्रिभुवनादित्यवर्मन त्रिभुवनादित्यवर्मन इ.स. ११६५इ.स. ११७७
चंपाचे आक्रमण: इ.स. ११७७-इ.स. ११८१
२३ जयवर्मन सातवा जयवदन इ.स. ११८१इ.स. १२१८
२४ इंद्रवर्मन दुसरा इंद्रवर्मन इ.स. १२१८इ.स. १२४३
इंद्रवर्मनच्या राज्यकाळात इ.स. १२३८मध्ये फो खून श्री इंद्रजित याने सुकोथाईमध्ये वेगळे राज्य स्थापले. हे थायलंडमधील पहिले मोठे राज्य होते.
२५ जयवर्मन आठवा जयवर्मन इ.स. १२४३इ.स. १२९५
२६ इंद्रवर्मन तिसरा श्री इंद्रवर्मन इ.स. १२९५इ.स. १३०७
२७ इंद्रजयवर्मन श्री जयवर्मन इ.स. १३०७इ.स. १३२७
२८ जयवर्मन नववा जयवर्मन ब्रह्मेश्वर/जयवर्मन परमेश्वर इ.स. १३२७इ.स. १३३६
२९ त्रोसोक पीम पोन्हिआ जय इ.स. १३३६इ.स. १३४०
३० निप्पियन बाट निप्पियन बाट इ.स. १३४०इ.स. १३४६
३१ लोंपोंग राजा लोंपोंग राजा इ.स. १३४६इ.स. १३५१
इ.स. १३५२-इ.स. १३५७ दरम्यान सयाम (थायलंड)चे आक्रमण
३२ सोर्यावोंग सूर्यवंग इ.स. १३५७इ.स. १३६३
३३ बोरोम रीचीआ पहिला ब्रह्मराज इ.स. १३६३इ.स. १३७३
३४ थोम्मा साओक थोम्मा साओक इ.स. १३७३इ.स. १३९३
१३९३मध्ये सयाम (थायलंड)चे आक्रमण
३५ इन रीचीआ इंद्र राजा इ.स. १३९४-इ.स. १३२१च्या सुमारास
३६ बोरोम रीचीआ दुसरा ब्रह्मराज दुसरा, पोन्हीआ याट इ.स. १४२१च्या सुमारास–इ.स. १४६३

हे सुद्धा पहा[संपादन]