Jump to content

जयवर्मन दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरा जयवर्मन (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី២) (अंदाजे इ.स. ७७०इ.स. ८५०)[१] हा ख्मेर राजवंशाचा पहिला राजा होता.

सध्याच्या कंबोडिया देशातून बव्हंश आग्नेय आशियावर सत्ता असलेल्या या साम्राज्याची स्थापना या जयवर्मनने इ.स. ८०२मध्ये केली व पुढील सहाशे वर्षे हे साम्राज्य अस्तित्वात होते. त्याआधी कंबोडियामध्ये अनेक छोटी राज्ये व जहागिरी होत्या व त्यांच्यावर जावा साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स. ८०२मध्ये जयवर्मनने जावा साम्राज्याचा पराभव करून महेंद्रपर्वत या शहरात आपला राज्याभिषेक करवून घेतला..[२] आता फ्नोम कुलेन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतावर जयवर्मनला चक्रवर्ती सम्राट घोषित करण्यात आले. या वेळी त्याला कंबोज भाषेत कम्राटेन जगद ता राजा आणि संस्कृतमध्ये देवराजाची विशेषणे दिली गेली. जयवर्मन काही काळ जावामध्ये राहिलेला होता. तेथील शैलेन्द्र राजवंशाने घेतलेल्या देवराजा विशेषणासारखे हे विशेषण होते ज्याद्वारे जयवर्मन आणि त्याच्या वंशजांना राज्य करण्याचा अबाधित अधिकार मिळाला.[३]

सदोक काक थोम येथील देवळातील शिलालेखानुसार, जयवर्मनने महेन्द्र पर्वतावर हिरंदम नावाच्या ब्राम्हणाकडून राज्याभिषेक करवून घेऊन त्याद्वारे आपले देवराजत्व आणि चाक्रवर्त्य घोषित केले होते. अशा रीतीने त्याने कंबोजवर एकछत्री राज्य स्थापन केले व ख्मेर साम्राज्याची सुरुवात केली.

जयवर्मन इ.स. ८५०मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर त्याला परमेश्वर असे विशेषण देण्यात आले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा तिसरा जयवर्मन सम्राट झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "जन्म-मृत्यू तारखा" (इंग्लिश भाषेत). २०१०-११-२३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ आल्बानीझ, मेरिलिया. आंगकोरचा खजिना (इंग्लिश भाषेत). इटली. p. 24.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ विद्योनो, बेनी. डान्सिंग इन शॅडोज: सिहानूक, द ख्मेर रूज ॲन्ड द युनायटेड नेशन्स इन कंबोडिया (इंग्लिश भाषेत). २०१३-०२-२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
मागील
--

साचा:क्रम-title

पुढील
तिसरा जयवर्मन