इंद्रवर्मन पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंद्रवर्मन पहिला (ख्मेर: ឥន្រ្ទវរ្ម័នទី១) हा ख्मेर राजवंशाचा तिसरा सम्राट होता. इंद्रवर्मन इ.स. ८७७ ते इ.स. ८८९पर्यंत सत्तेवर होता. याची राजधानी हरिहरालय येथे होती. याने आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक भव्य देवळे व इतर इमारती बांधल्या. याचबरोबर त्याने कंबोडियामध्ये अनेक सरोवरे व कालवे बांधले. यामुळे तेथे भातशेती करणे सोपे झाले. आपल्या राज्याभिषेकानंतर इंद्रवर्मनाने जाहीर केले की मी पाच दिवसांच्या आत खणणे सुरू करेन.[१] त्याप्रमाणे त्याने इंद्रताटक हे त्यावेळचे सगळ्यात मोठे सरोवर बांधले. ३.८ किमी लांबी व ८०० मीटर रुंदीच्या या सरोवरात ७५ लाख घनमीटर पाणी साठवणे शक्य होते. आता हे सरोवर कोरडे आहे.

इंद्रवर्मन इ.स. ८८९मध्ये मृत्यू पावला. याच्यानंतर यशोवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


इतर संदर्भ[संपादन]

मागील
तिसरा जयवर्मन
ख्मेर राजवंश
इ.स. ८७७-इ.स. ८८९
पुढील
पहिला यशोवर्मन