Jump to content

खाड्याचापाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?खाड्याचापाडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नेरळ व बदलापूर
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी= आगरी
सरपंच
बोलीभाषा आगरी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५१
• एमएच/४६

खाड्याचापाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील, पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

उल्हास नदी व पोसरी नदीच्या संगम जवळ हे गाव वसले आहे. गावाच्या दक्षिण व पश्चिम भागात भात शेती व मळे असून पूर्व व उत्तर दिशेला जंगले आहेत. त्या जंगलामध्ये काही वर्षांपासून फार्म हाऊस व विविध इमारती बांधकाम झाले आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

संपूर्ण गाव आगरी समाज वस्तीचा आहे. सुमारे ८० कुटुंब या गावात राहतात. बहुतेक लोक भात शेती करतात व इतर जोडव्यवसाय करतात. गावातील ७०% कुटुंबातील पुरुष BSNL या येथे कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतेक जण सेवानिवृत्त झाले आहेत. सरकारी नोकरी करणारे बहुतांश लोक असल्याने घरे चांगल्या स्थितीत आहेत. वडीलधाऱ्या माणसांच्या पावलावर पाऊल ठेवून तरुण पिढीत काही जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक शिक्षक, SBI मध्ये Assistant manager, महावितरण, रेल्वे या ठिकाणी कार्यरत आहेत. तरुण मुलांना क्रिकेट आवडत असल्याने बऱ्याच ठिकाणी चांगली कामगिरी करून पारितोषिके मिळाली आहेत. गावातील लोक सर्व प्रकारचे सण उत्सव आनंदाने साजरे करतात.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

वनलक्ष्मी धबधबा, पोसरी नदी किनारा, उल्हास नदी किनारा, समृद्ध वनसंपत्ती

नागरी सुविधा

[संपादन]

वांगणी रेल्वे स्थानक ४.५ किमी अंतरावर असलेल्या या गावात येण्यासाठी रिक्षांची व्यवस्था आहे. त्यामुळे कामानिमित्त सहजगत्या दररोज बदलापूर, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई येथे येणे जाणे लोक करतात.

जवळपासची गावे

[संपादन]

पाषाणे, आर्ढे, मानिवली ,

संदर्भ

[संपादन]
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम