खांडवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खांडवा is located in मध्य प्रदेश
खांडवा
खांडवा
खांडवाचे मध्य प्रदेशमधील स्थान

खांडवा (हिंदीत खंडवा, बोलीभाषेत खंडुआ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. खांडवा शहर हे त्या राज्याच्या दक्षिण भागात इंदूरच्या १३० किमी दक्षिणेस तर भोपाळच्या २८० किमी नैर्ऋत्येस वसले आहे. २०११ साली खांडव्याची लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती.

खांडवा रेल्वे स्थानक हे जंक्शन भारतीय रेल्वेच्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खांडवामधून जातो. खांडवा रेल्वे स्थानक मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.