Jump to content

खडीगंमत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


खडीगंमत हे विदर्भातील अतिशय पुरातन लोकनाटय असून त्याचे नाते चक्रधरांचे चरित्र असलेल्या बाराव्या शतकातील लीळाचरित्र या मराठीच्या आघ गघ ग्रंथाशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संत साहित्यात उल्लेखिलेल्या पण आज नामशेष झालेल्या डफगाण या पुरातन लोकनाट्याशी त्याचा संबंध जोडून खरीगंमत ते खडीगंमत असा नामांतराचा प्रवास झाला. त्यानंतर मोगलांच्या काळात हीच खडीगंमत पश्चिम महाराष्ट्रात तमाशा या नवीन नावाने प्रचारात आली, असा खडीगंमत अभ्यासक डाॅ. हरिश्चंन्द्र बोरकर यांचा दावा आहे.