खांडवा
(खंडवा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
खांडवा (हिंदीत खंडवा, बोलीभाषेत खंडुआ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.. खांडवा शहर हे त्या राज्याच्या दक्षिण भागात इंदूरच्या १३० किमी दक्षिणेस तर भोपाळच्या २८० किमी नैर्ऋत्येस वसले आहे. २०११ साली खांडव्याची लोकसंख्या २,००,७३८ इतकी होती.
खंडवा रेल्वे स्थानक हे जंक्शन भारतीय रेल्वेच्या वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग खांडवामधून जातो. खांडवा रेल्वे स्थानक मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.