कोसिमो दे मेदिची
कोसिमो दि जियोव्हानी दे मेदिची (२७ सप्टेंबर, १३८९ - १ ऑगस्ट, १४६४) हा मध्ययुगीन इटलीमधील बँकर आणि राजकारणी होता. याने इटालियन रिनैसाँ काळात फिरेंझे शहर आणि प्रजासत्ताकात मेदिची घराण्याची सत्ता स्थापन केली. त्याने आपल्या सावकारी आणि बँकव्यवसायातून मिळवलेल्या संपत्तीच्या बळावर आणि इतर श्रीमंत कुटुंबांशी लग्नांद्वारे आपली सत्ता स्थापली आणि मजबूत केली.[१] सत्ता आणि राजकारणाशिवाय कोसिमोने आपला पैसा चित्रकला, शिल्पकला, संगीत, शिक्षण आणि वास्तुकलेतील कलावंताना आश्रय देण्यात खर्च केला. [२] त्याने यात ६,००,००० फ्लोरिन (२०२४ चे सुमारे ५,००० कोटी रुपये) खर्च केले. [३] [४]
फिरेंझेवरील कोसिमोची पूर्ण सत्ता असली तरी ती निरंकुश नव्हती. त्याचे समकालीन राजकारणी त्याला हुकुमशहा नव्हे तर अग्रगण्य नागरिक मानत फ्लॉरेन्सच्या विधान परिषदेने त्याच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्याच्या अनेक प्रस्तावांना विरोध केला होता आणि त्यातून त्याने मार्ग काढले.
चरित्र
[संपादन]सुरुवातीचे जीवन आणि कौटुंबिक व्यवसाय
[संपादन]कोसिमोचा जन्म फिरेंझेमध्ये २७ सप्टेंबर, १३८९ रोजी जियोव्हानी दि बिक्की दे मेदिची आणि त्याची पत्नी पिक्कार्दा बुएरी यांच्या घरी झाला त्याला दामियानो नावाचा जुळा भाऊ होता परंतु तो अल्पकाळच जगला कोसिमोला सहा वर्षांनी लहान एक भाऊ लोरेन्झो देखील होता, जो " लॉरेंझो माज्योरे म्हणून ओळखला जातो. याने कोसिमोबरोबर वडीलोपार्जित सावकारी आणि बँकांचा धंदा सांभाळला.
कोसिमोला त्याची संपत्ती आणि बँकिंगमधील कौशल्य या दोन्ही गोष्टी त्याच्या वडील जियोव्हानी यांच्याकडून वारशाने मिळाल्या. जियोव्हानी १३९७मध्ये रोममधून फिरेंझेला परतला आणि रोममधील अनुभवाच्या आधारावर स्वतःची बांको दै मेदिची ही बँक सुरू केली. पुढील दोन दशकांत, मेदिची बँकेने रोम, जिनिव्हा, व्हेनिस तसेच नेपल्समध्ये तात्पुरती, अशा शाखा उघडल्या. रोममधील शाखा व्यवस्थापक हा पोपचा डिपॉझितारियो जनराले होता जो मोबदला घेउन चर्चचे वित्तव्यवस्थापन करत असे. कोसिमोने नंतर संपूर्ण पश्चिम युरोपमध्ये बँकेचा विस्तार केला आणि लंडन, पिसा, आव्हियों, ब्रूज, मिलानो, [५] आणि ल्युबेक येथे कार्यालये उघडली . [६] या दूरवरच्या शाखांमुळे युरोपच्या अनेक भागांतील व्यवसाय करणाऱ्यांना तसेच चर्चनाही जवळच्या शाखेत पैसेभरून इतर ठिकाणी त्याच्या हुंडीवर मालसामान खरेदी करू शकत.[६] पहिल्या पंधरा वर्षांत बांको दे मेदिचीने २,९०,७९१ फ्लोरिनचा नफा कमवला. [५]
१४१५ च्या सुमारास, कोसिमोने व्हेर्नियोच्या अलेस्सांद्रो दि सोझ्झो बार्दीची मुलगी काँतेस्सिना दि बार्दीहिच्याशी लग्न केले. [७] पूर्वीीच्या धनाढ्य बार्दी कुटुंबाशी संबंध जुळविण्यासाठी कोसिमोच्या वडीलांनी हे लग्न ठरवले होते. तरीसुद्धा बार्दींपैकी काहींना मेदिची नापसंतच होते. [८]
कोसिमो आणि काँतास्सिनाला दोन मुलगे झाले: पिएरो दि कोसिमो दे मेदिची (जन्म १४१६) आणि जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची (जन्म १४२१). [७] कोसिमो त्याच्याकडी सर्केशियातील गुलामापासून कार्लो हा एक अनौरस मुलगा देखील झाला..
१४२०मध्ये जियोव्हानीने मेदिची बँकेचा कारभार कोसिमो आणि लॉरेंझोकडे सोपवला. त्याने मुलांना १,७९,२२१ फ्लोरिन आणि बँकेचा २/३ हिस्सा वारशात दिले. [९] याशिवाय आपल्या मूळ गाव मुगेल्लोमधील मोठी जमीनही त्यांच्या नावावर केली.
फिरेंझेचे राजकारण
[संपादन]कोसिमोने आपल्या संपत्तीचा वपर करीत पदाधिकारी तसेच फिरेंझेच्या सिन्योरियाच्या सदस्यांना आपल्या कह्यात ठेवले. फिरेंझेला आपल्या "लोकशाही" चा अभिमान असल्याने कोसिमोने पडद्यामागून सूत्रे चालवली. एनिआ सिल्व्हियो पिकोलोमिनी, सिएनाचे बिशप आणि नंतर पोप पायस दुसऱ्याने, कोसिमोबद्दल लिहिले आहे:
राजकारणातील निर्णय कोसिमोच्या घरातच घेतले जातात. त्याने ठरवलेला माणूस पदावर चढतो. युद्ध, संधी कि तह हे कोसिमोच ठरवतो. नावाने नसला तरीही कोसिमोच राजा आहे.[१०]
— पोप पायस दुसरा
१४३३ च्या सुमारास कोसिमोचा फिरेंझेमधील वाढता प्रभाव पारून स्त्रोझ्झी आणि आल्बिझ्झी घराण्यांना तो धोकादायक वाटू लागला. कोसिमोने रचलेला लुक्कावरील हल्ला फसल्याचे कारण काढून त्याला पलाझ्झो व्हेक्कियोमध्ये कैद करण्यात आले आणि त्याला मृत्युदंड देण्याच्या मागण्या सुरू झाल्या. [१२] ख्रिश्चन साधू अँब्रोजियो त्राव्हेर्सारीने कोसिमोसाठी रदबदली केल्यावर त्याऐवजी त्याला फिरेंझेमधून हाकलून देण्याची शिक्षा दिली गेली. कोसिमो फिरेंझेतून निघून पादुआ आणि नंतर व्हेनेझ्झियाला गेला. त्याने आपला व्यवसाय आणि बँकही सोबत नेली. व्हेनिसने त्याच्या वतीने फिरेंझेला एक दूत पाठवला आणि कोसिमोच्या हद्दपारीचा आदेश रद्द करण्याची विनंती केली. फिरेंझेने याला नकार दिल्यावर कोसिमोने व्हेनिसमध्ये जम बसवला. त्याचा भाऊ लॉरेन्झो त्याच्यासोबत होता. या दोघांनी फिरेंझेमधील कलावंत आणि अधिक महत्वाचे म्हणजे तेथील व्यवसाय आणि पैसा व्हेनेझ्झियाला ओढला. हा ओढा इतका मोठा होता की फिरेंझेला कोसिमोवरील हद्दपारीचा आदेश परत घेणे भाग पडले. [१३] एका वर्षाने कोसिमो फिरेंझेला परतला आणि पुढील ३० वर्षे त्याने फिरेंझेचा शासक म्हणून घालवली.
मृत्यू
[संपादन]कोसिमो १४६४मध्ये करेज्जी येथे मृत्यू पावला. त्याच्यानतर त्याचा मुलगा पिएरो (लॉरेन्झो इल मॅग्निफिकोचे वडील) हा सत्तेवर आला. कोसिमोच्या मृत्यूनंतर, सिन्योरियाने त्याला पेटर पाट्रिया, ''पितृभूमीचा पिता'' ही पदवी दिली, जी पूर्वी सिसेरोला देण्यात आली होती. [१४]
कलाश्रय
[संपादन]कोसिमो दे मेदिचीने आपला पैसा व संपत्ती फिरेंझेच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी तसेच वक्ते, कवी, तत्त्वज्ञ आणि कलावंतांना आश्रय देण्यासाठी वापरले.
कोसिमोने मिकेलोझ्झो मिकेलोझ्झीकडून पलाझ्झो मेदिची हा भव्य आणि तरीही अघळपघळ नसलेला असा राजवाडा बांधून घेतला. या वास्तूचा फिरेंझेमधील इमारतींवर मोठा प्रभाव आहे. १५व्या शतकातील ही इमारत आजही तशीच शाबूत आहे. कोसिमोच्या पदरी असलेल्या विक्षिप्त (आणि दिवाळखोर) वास्तुविशारद ब्रुनेलेशीने १४३६मध्ये कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरेचा घुमट पूर्ण केला.[१५]
संदर्भ
[संपादन]- ^ "An Introduction to the Course – Introduction, Empirical Background and Definitions". Coursera (इंग्रजी भाषेत). 2022-09-30 रोजी पाहिले.
- ^ Strathern, Paul (2005). The Medici: Godfathers of the Renaissance. London: Pimlico. pp. 45–126. ISBN 978-1-84413-098-6.
- ^ "Medici Patronage Notes < Brunelleschi". bdml.stanford.edu. 20 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-05-20 रोजी पाहिले.
- ^ "How the Medici family's influences are still felt today". Guide (इंग्रजी भाषेत). 19 April 2017. 2021-05-20 रोजी पाहिले.
- ^ a b Setton, Kenneth M. (Ed.) (1970). The Renaissance: Maker of Modern Man. National Geographic Society. p. 46.CS1 maint: extra text: authors list (link)
- ^ a b Hallam, Elizabeth (1988). The War of the Roses. New York: Weidenfeld & Nicolson. p. 111.
- ^ a b Tomas 2003.
- ^ Kent, Dale (1978). The Rise of the Medici. Oxford. pp. 49–61.
- ^ Burckhardt, Jakob (1960). The Civilization of the Renaissance in Italy. The New American Library, inc. p. 900.
- ^ Quoted by C.Hibbert in The Rise and Fall of the House of Medici, 1974 in Martin Longman, Italian Renaissance (Longman, 1992).
- ^ After the return of the Medici in 1512, Lorenzo di Piero formed a compagnia for carnival 1513, and called it Broncone; the Pontormo portrait was commissioned by Goro Gheri, Lorenzo's secretary. Shearman, John (November 1962). "Pontormo and Andrea Del Sarto, 1513". The Burlington Magazine. 104 (716): 450, 478–483.
- ^ Durant, Will (1953). The Renaissance. The Story of Civilization. 5. New York: New York. p. 193.
- ^ Williams, Henry Smith (1905). The History of Italy. The Historians' History of the World. 9. New York: The Outlook Company. p. 352.
- ^ Jones, Jonathan (18 October 2003). "Cosimo the Elder, Pontormo (c1516-20)". The Guardian. 29 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 April 2018 रोजी पाहिले.
- ^ "Medici: Godfathers of the Renaissance. Brunelleschi". www.pbs.org. 27 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 April 2018 रोजी पाहिले.