बेसिलिका दि सान लॉरेन्झो (फिरेंझे)
बेसिलिका दि सान लोरेन्झो (सेंट लॉरेन्सचेी बॅसिलिका) हे इटलीच्या फिरेंझे शहरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या चर्चांपैकी एक आहे. हे शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. हे चर्च मेदिची घराण्याच्या सर्व प्रमुख सदस्यांचे दफनस्थान आहे. येथे कोसिमो इल व्हेक्कियो पासून तिसऱ्या कोसिमोपर्यंत सगळ्यांच्या समाध्या आहेत. या चर्ची बांधणी इ.स. ३९३मध्ये संपली.[१] त्यावेळी ते शहराच्या भिंतीबाहेर होते.
बेसिलिका दि सान लॉरेंझो हे मेदिची घराण्याच्या कुलाचारांचे चर्च होते. १४१९ मध्ये जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीने येथील उभ्या असलेल्या ११व्या शतकातील रोमन बांधणीच्या इमारतीच्या जागी नवीन चर्च बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे चर्च फिरेंझेच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या चर्च संकुलाचा भाग आहे. याच्या जवळच अनेक महत्त्वाच्या वास्तुशिल्प आणि कलात्मक कामांचा आहेत. यांत ब्रुनेलेस्कीने रचलेली आणि दोनातेल्लोने सजावट केलेली साग्रेस्तिया व्हेक्किया (जुनी सॅक्रिस्टी), साग्रेस्तिया नुओव्हा (नवी सॅक्रिस्टी) मिकेलेंजेलो रचित लॉरेन्शियन लायब्ररी, कपेल्ली मेदिची, कपेल्ला दै प्रिन्सिपी, इ. इमारती आहेत.
अंत्यसंस्कार स्मारके
[संपादन]- बेर्नार्दो सेनिनी (सोनार आणि मुद्रक) (दक्षिण ट्रान्ससेप्ट)
- दोनातेल्लो (उत्तर ट्रान्ससेप्ट)
- फ्रांचेस्को लँदिनी (दक्षिण मार्ग)
- निक्कोलॉ मार्तेल्ली (उत्तर ट्रान्ससेप्ट)
- कोसिमो दे मेदिची (उंच वेदीच्या समोर)
- पहिला कोसिमो दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- दुसरा कोसिमो दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- तिसरा कोसिमो दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- पहिला फर्डिनांडो दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- दुसरा फर्डिनांडो दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- तिसरा फर्डिनांडो दे मेदिची (क्रिप्ट)
- पहिला फ्रांचेस्को दे मेदिची ( कपेल्ला दै प्रिन्सिपी )
- जिओव्हानी दि बिक्की दे मेदिची ( साग्रेस्तिया व्हेक्किया )
- जिओव्हानी दि कोसिमो दे मेदिची ( साग्रेस्तिया व्हेक्किया )
- जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची ( साग्रेस्तिया नुओव्हा )
- जुलियानो दि पिएरो दे मेदिची ( साग्रेस्तिया नुओव्हा' )
- लॉरेंझो दे मेदिची ( साग्रेस्तिया नुओव्हा )
- दुसरा लोरेन्झो दे मेदिची ( साग्रेस्टिया नुओवा )
- पिएरो दि कोसिमो दे मेदिची ( सग्रेस्टिया वेचिया )
- निकोलस स्टेनो
संदर्भ
[संपादन]- ^ Haegen, Anne Mueller von der; Strasser, Ruth F. (2013). "San Lorenzo". Art & Architecture: Tuscany. Potsdam: H.F.Ullmann Publishing. p. 240. ISBN 978-3-8480-0321-1.