Jump to content

कोराझोन एक्विनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोराझोन अक्विनो

Flag of the Philippines फिलिपिन्सची ११वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी १९८६ – ३० जून १९९२
मागील फेर्दिनांद मार्कोस
पुढील फिदेल रामोस

जन्म २५ जानेवारी, १९३३ (1933-01-25)
तार्लाक, फिलिपिन्स
मृत्यू १ ऑगस्ट, २००९ (वय ७६)
मकाटी, मनिला महानगर
पती बेनिनो अक्विनो, ज्यु.
धर्म रोमन कॅथलिक
सही कोराझोन एक्विनोयांची सही

कोराझोन अक्विनो (फिलिपिनो: María Corazón Sumulong Cojuangco Aquino; २५ जानेवारी १९३३ - १ ऑगस्ट २००९) ही फिलिपिन्स देशाची ११वी व पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होती. १९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेली अक्विनो तिच्या कार्यकाळात फिलिपिन्समधील सर्वात प्रभावी राजकारणी होती. फेर्दिनांद मार्कोसच्या २० वर्षाच्या जुलुमी राजवटीविरुद्ध १९८६ साली झालेल्या बंडामध्ये अक्विनोचा मोठा सहभाग होता. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी गृहिणी राहिलेल्या अक्विनोला कोणत्याही प्रकारच्या शासनाचा अनुभव नव्हता. परंतु १९८३ साली तिच्या सेनेटर पतीची हत्या झाल्यानंतर ती राजकारणामध्ये उतरली.

१९९२ साली राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर अक्विनोने कायमचे राजकारण सोडले. १९९८ साली तिला मॅगसेसे पुरस्कार मिळाला. २००९ मध्ये कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

[संपादन]