कृत्रिम रेतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.नंतर त्याद्वारे गाय, म्हैस, अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते.

या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशूसंतती निर्माण होते व पशूपालनात आणि पशूंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.

साधारणतः वळू अथवा रेड्याचे वीर्य हे आठवड्यातून दोन वेळा संकलित केल्या जाते.त्यास नंतर उणे (-)१९६ अंश सेल्सियस तापमानावर गोठविल्या जाते. हे वीर्य सुमारे १०० ते २०० वर्षे वापरता येऊ शकते.

महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या पशू वैद्यकिय रुग्णालयात, पशुंची कृत्रिम रेतन सुविधा व असे रेत उपलब्ध असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.