कुंडलिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुंडलिनी (संस्कृत कुण्डलिनी, “वेटोळे असलेली”) ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची संकल्पना अाहे. ही दैवी ऊर्जा (किंवा शक्ती) पाठीच्या कण्याच्या तळाशी (मूलाधार नावाच्या चक्रात) वसलेली असते असे मानले जाते. ही संकल्पना शैव तंत्रामध्येही अाढळते. तिथे कुंडलिनीस दैवी स्त्रीत्वाशी संबंधित असलेली शक्ती मानले जाते. तांत्रिक अभ्यासानुसार ह्या ऊर्जेची जागृती झाल्यास अध्यात्मिक मुक्ती लाभते असे मानले जाते. शाक्तमतातील परादेवी वा आदि पराशक्ती या सर्वोच्च सत्तेशी अाणि भैरवीकुब्जिका या देवींशी कुंडलिनीचा संबंध अाहे. अकराव्या शतकात ही संज्ञा तिच्याशी संबंधित अाचारांसह हठ योगामध्ये स्वीकारली गेली.

कुंडलिनी जागृती अनेक मार्गांनी झाल्याची वर्णने उपलब्ध अाहेत. योगाच्या अनेक शाखांमध्ये ध्यान, प्राणायाम, अासनाभ्यास वा मंत्रजपाद्वारे कुंडलिनी जागृतीचा प्रयत्न केला जातो. कुंडलिनी योगावर शाक्तवादाचा व तंत्रमार्गाचा प्रभाव अाहे. या योगाचे नावच मुळी मंत्र, तंत्र, यंत्र, आसने वा ध्यान यांच्या नियमित अभ्यासाद्वारे कुंडलिनी जागृतीवर लक्ष केंद्रित करण्यातून व्युत्पन्न झालेले आहे.