Jump to content

कालीषबी मैहबूब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमती कालीषबी मैहबूब (डिसेंबर २०, इ.स. १९५८:आंध्र प्रदेश, भारत - ) एक भारतीय शास्त्रीय संगीत नादस्वरम कलाकार आहेत. ती तिचे पति शेख मैहबूब सुबानि यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करते,[] जे नादस्वरम कलाकार देखील आहेत. या दोघांना भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.[]

कालीषबी मैहबूब
आयुष्य
जन्म २०डिसेंबर १९५८
जन्म स्थान चेकूरपाडू , प्रकाशम , आंध्र प्रदेश, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

ओळख आणि कारकीर्द

[संपादन]

श्रीमती कालीषबी मैहबूब यांचा २० डिसेंबर १९५८ रोजी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील चेकूरपाडू येथे यांचा जन्म झाला. श्रीमती कालीषबी यांच पालनपोषण वयाच्या ५ व्या वर्षी त्यांचे काका शेख जॉन साहेब यांनी केले त्यांच्याच छत्रछायेखाली नादस्वरम प्राविण्य प्राप्त केले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी स्टेजवर परफॉर्म करण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये शेख मैहबूब सुबानि यांच्याशी विवाह केल्यानंतर, []तिने आपल्या पतीच्या आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील शासकीय शारदा संगीत कलाशाळेचे प्राचार्य श्री के चंद्रमौली यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. या जोडप्याने गणकला परपूर्ण डॉ. शेख चिन्ना मौलाना साहेब यांच्याकडे १५ वर्षे अभ्यास केला आणि प्रख्यात तंजावुर बानोंचे ज्ञान संपादन केले. पती-पत्नी दोघांनीही भारतभरातील जवळपास सर्वच नामवंत संगीत महोत्सवांमध्ये नादस्वरम सादर केले आहेत.[] प्रांत, धर्म, भाषा आणि पंथ यांचे अडथळे ओलांडून त्यांनी आपली ही पारंपारिक कला जगभर प्रस्थापित करण्याचे व्रत घेतले आहे. अबू धाबी, ब्रुसेल्स कॅनडा, दुबई, फ्रान्स, जर्मनी, जपान, मलेशिया, श्रीलंका यूएसए आणि यूके अशी अनेक ठिकाणे.[]

पुरस्कार

[संपादन]
  • कलईमामणी पुरस्कार, तामिळनाडू सरकार, १९९४
  • कलारत्न पुरस्कार (हमसा ) , आंध्र प्रदेश सरकार, २०१७[]
  • पद्मश्री पुरस्कार , २०२०[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Cauvery bank resonates with Tarangam". द हिंदू (English भाषेत). 13 March 2014. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Recipients of the Padma awards this year talk about their respective journeys". द हिंदू (English भाषेत). 31 January 2020. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Making music with the nadaswaram since 1978". द हिंदू (English भाषेत). 16 May 2018. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Notes of erudition on the nagaswaram". द हिंदू (English भाषेत). 30 July 2010. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Nadhaswaram couple elated with Padma Shri award". lokmattimes.com (English भाषेत). 27 January 2020. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "Andhra Pradesh announces names of Kala Ratna (Hamsa) awardees". newindianexpress.com (English भाषेत). 28 March 2017. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "Smt. Kaleeshabi Mahaboob and her husband Sheik..." (PDF). Padmaawards.gov.in (English भाषेत). 16 February 2023. 16 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 16 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)