कानमंडाळे
?कानमंडाळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | चांदवड |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कानमंडाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्याच बरोबर आत्ता नवीन पिढी कुकूटपालन आणी खासगी वाहतूक व्यवसाय सुद्धा करू लागली आहे.साक्षरतेचे प्रमाण ७०-८०% आहे.स्व.भागूजी चौधरी (पवार ) माजी सरपंच यांच्या अथक प्रयत्नाने कांचन डोंगर आणी हंड्या डोंगर या मधून खिंड तयार करून खान्देश मधील देवाला शहराला जोडणारा मार्ग तयार करण्यात आला होता.ऎतिहासिक वारसा गावाला लाभलेला असून नवीन पिढीने तो जपावा हिच अपेक्षा.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]इखारा डोंगर - नाथ सांप्रदायाचे प्राचीन मंदिर डोंगरावर असून जिवंत पाण्याचे प्राचीन टाके आहेत.
किल्ले धोडप - श्रीमंत माधवराव पेशवे यांचा आवडता किल्ला असा ज्याचा उल्लेख होतो तो कानमंडले गावाला लागून आहे, तसेच रघुनाथ पेशवे आणी माधवराव पेशवे यांची प्रसिद्ध लढाईचा इतिहास किल्ल्याला आहे. किल्यावर जुने अवशेष अजून याची साक्ष देतात. पूर्वी किल्ल्यावरील हत्ती तळ्या जवळ सुमारे ८-१० तोफा होत्या पण नंतर सरकारने १९९०-९३ च्या आसपास त्या जमा केल्या,असे सांगतात.पण किल्ल्या वरील तटबंदी आजून तरी स्वतःचे असतीत्व टिकवून आहे.हौशी पर्यटकांनी आपला ऎतिहासिक ठेवा जपावा हिच प्रार्थना. धोडप गड हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्लयात गणला जातो.
नागरी सुविधा
[संपादन]महाराष्ट्र परीवहन मंडळाची निफाड डेपोतन मुक्कामी यसटी सेवा असून नाशिक देवला बस सेवा पण आहे.त्याच बरोबर खासगी वाहने सुद्धा चालू असतात. गावात सरकारी तसेच खासगी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीचे कार्यालय असून सरकारी शाळा प्रसिद्ध आहे.
जवळपासची गावे
[संपादन]पुरी,धोडांबे, हट्टी कन्हेरवाडी, शिंदे बहाळे,वडाळी इत्यादी.