काठ (वस्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक स्त्री 'जरतारी' काठ असलेले लुगडे नेसून-रविवर्म्याने काढलेले एक चित्र.

काठ म्हणजे स्त्री किंवा पुरुष यांच्या वस्त्रास,वस्त्राच्या रंगाव्यतिरिक्त असलेली 'किनार' आहे. याने वस्त्र खुलून दिसते.परिधान करणाऱ्या व्यक्तिची शोभा वाढते.पुरुषांचे धोतर, उपरणे,लुंगी यासारख्या वस्त्रास तर स्त्रीयांचे पाच अथवा नऊ वारी पातळ किंवा साडीसही काठ राहतो. याची रुंदी कमी जास्त राहू शकते.

वस्त्र खरेदी करणाऱ्याच्या आवडीनुसार व आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या काठाची वस्त्रे उपलब्ध असतात.पूर्वी यास जरीचा काठ रहात असे.यावरूनच अश्या वस्त्रास 'भरजरी वस्त्र' म्हणण्याचा प्रघात पडला.पुरातनकाली, पैठणीस सोन्याच्या तारेने काढण्यात आलेली जरी लावण्यात येत असे.