काचीन राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काचीन हे म्यानमार देशातील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. त्याच्या उत्तरेस चीन देशातील तिबेट प्रदेश, पूर्वेस चीनमधील युन्नान प्रदेश, दक्षिणेस शान राज्य आणि पश्चिमेस सागाइंग प्रदेश व भारतातील अरुणाचल प्रदेश राज्य आहे. काचीन राज्याचे क्षेत्रफळ ८९,०४१ चौ.कि.मी. असून म्यिटक्यिना शहर ही राजधानी आहे.

काचीन राज्यात म्यानमारमधील खाकाबो राझी हे सर्वोच्च शिखर आहे.

समाजव्यवस्था[संपादन]

काचीन राज्याची लोकसंख्या १२ लाख असून बहुतांश लोक हे काचीन वंशाचे आहेत. सुमारे ५८.५% लोक हे बौद्ध धर्म पाळतात आणि ३८.३% लोक ख्रिश्चन धर्म पाळतात. जिंगफाॅ ही येथील पारंपारिक तसेच संपर्काची भाषा आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: