Jump to content

कस्तुरीमृग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कस्तुरी मृग या पानावरून पुनर्निर्देशित)
कस्तुरीमृग

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(Artiodactyla)

कुळ: कस्तुरीमृगाद्य
(Moschidae)

ग्रे, इ.स. १८२१
जातकुळी: मोशस
(Moschus)

लिनिअस, इ.स. १७५८

कस्तुरी मृग (शास्त्रीय नाव: Moschus moschiferus मोशस मोशीफेरस ; इंग्लिश: Musk deer, मस्क डियर) हे कस्तुरीमृगाद्य कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. सारंगाद्य (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खऱ्या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्तनाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणाऱ्या कस्तुरी ग्रंथी असतात.

वैशिष्ठ्ये

[संपादन]

कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.

कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो[].

सांस्कृतिक संदर्भ

[संपादन]

कस्तुरीमृग हा भारतातील उत्तराखंड राज्याचा राज्यपशु आहे.

तत्त्वज्ञान व साहित्यातील संदर्भ

[संपादन]

कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन भारतीय उपखंडातल्या भक्तिमार्गी साहित्यात व तत्त्वज्ञानात अनेक वेळा केले आहे [].

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ प्रेटर, एस.एच. द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.[मृत दुवा]
  2. ^ संत कबीर. कबीररचित साखी (मध्ययुगीन हिंदुस्तानी भाषेत). "कस्तुरी कुंडली बसे मृग धुंडे बन माही , ऐसे घट घट राम हे दुनिया देखे नाही," (अर्थ: ज्याप्रमाणे कस्तुरी हे बेंबीतच असते, पण कस्तुरी मृग ते सार्‍या जंगलात शोधतो, त्याचप्रमाणे देव प्रत्येकाच्या ह्रिदयात बसतो, पण लोक त्याला इतरत्र शोधतात)CS1 maint: unrecognized language (link)