कशिमा
Appearance
हा लेख जपानी क्रुझर कशिमा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कशिमा (निःसंदिग्धीकरण).
कशिमा (जपानी:鹿島 練習巡洋艦; कशिमा रेन्शुजुनयोकान) ही जपानच्या शाही आरमाराची क्रुझर होती.
काटोरी प्रकारच्या क्रुझरांपैकी ही दुसरी क्रुझर असून तिला इबाराकी येथील कशिमा जिंगु या शिंटो देवळाचे नाव देण्यात आले होते.
दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईत कशिमा ही जपानी सेनापती शिगेयोशी इनोउचे ठाणे होती. रबौल येथून हालचाली करीत कशिमाने या प्रदेशातील जपानी सैन्याचे नेतृत्व केले.
युद्ध संपल्यावर अमेरिकेने कशिमाचा ताबा घेतला व जपानी युद्धबंदी सैनिक दूरपूर्वेतून जपानला परत नेण्यासाठी हिचा वापर केला. १९४६-४७मध्ये कशिमाला नागासाकी येथे मोडीत काढून भंगारात विकण्यात आली.