Jump to content

रबौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रबौल पापुआ न्यू गिनीतील ईस्ट न्यू ब्रिटन प्रांतातील गाव आहे. इ.स. १९९४पर्यंत हे गाव प्रांताची राजधानी होते. त्यावर्षी जवळील रबौल काल्डेरा या ज्वालामुखीचा स्फोट होउन उडालेल्या राखेने गाव जवळजवळ नष्ट झाले होते. ही हजारो टन राख हजारो मीटर आकाशात उडाली व पावसासह रबौल व आसपासच्या प्रदेशात पडली. या राखेच्या वजनाने रबौलमधील जवळजवळ सगळ्या इमारती कोसळल्या. यानंतर राजधानी कोकोपो येथे हलवण्यात आली.

रबौल काल्डेरा अजूनही जागृत आहे व त्यामुळे रबौलवरचे संकट कायम आहे.