कराचीचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
Appearance
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
[संपादन]पाकिस्तानचा संघ
[संपादन]थोडक्यात वर्णन
[संपादन]मालिकेच्या पहिल्या दोन खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल होत्या तर कराचीची खेळपट्टी प्रतिकूल. भारताने नाणेफेक जिंकली व पाकिस्तानला फलंदाजी दिली. पहिल्याच षटकात इरफान पठाणने हॅटट्रिक घेउन सनसनाटी फैलावली. ६ बाद ३९ पासून भारताने पाकिस्तानला सर्वबाद २४५ पर्यंत मजल मारु दिली. भारताने ४ बाद ५६ पासून सर्वबाद २३८ गाठले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानने ७ बाद ५९९ धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १६० षटकात ६०७ धावा करायचे आव्हान ठेवले. भारताचा डाव २६५ धावात गुंडाळला गेला.
थोडक्यात धावफलक
[संपादन]पहिला डाव
[संपादन]- पाकिस्तान: २४५ (कामरान अक्मल-११३, इरफान पठाण-५/६१, रुद्र प्रताप सिंग-३/६६)
- भारत: २३८ (युवराजसिंग-४५, इरफान पठाण-४०, मोहम्मद आसिफ-४/७८, अब्दुल रझाक-३/६७)
दुसरा डाव
[संपादन]- पाकिस्तान: ७ बाद ५९९ घोषित (फैसल इकबाल-१३९, मोहम्मद युसुफ-९७, अब्दुल रझाक-९०, अनिल कुंबळे-३/१५१)
- भारत: २६५ (युवराजसिंग-१२२, अब्दुल रझाक-४/८८, मोहम्मद आसिफ-३/४८)
निकाल
[संपादन]पाकिस्तान ३४१ धावांनी विजयी.