करवंद
झुडूप प्रजाती | |||||||||||||||||||||||||||
माध्यमे अपभारण करा | |||||||||||||||||||||||||||
विकिपीडिया Wikispecies | |||||||||||||||||||||||||||
प्रकार | टॅक्सॉन | ||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
वापर |
| ||||||||||||||||||||||||||
IUCN conservation status | |||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||
करवंद (इंग्रजीत Karanda, conkerberry; हिंदीत करौंदा, करुम्चा: आसामी: कारेन्जा, मल्याळी: काराक्का, तामिळ: कलाहा , कन्नडा: करोंदा; शास्त्रीय नाव: Carissa carandas हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुप (कुंपण) करण्याच्या कामी येते.
उपयोग
[संपादन]पावसाळ्यात फळे -करवंद लागतात . सुंदर दिसतात . करवंदाच्या फळांची भाजी,रायता(लोणचे)चटणी , मुरब्बा करतात.कच्चेपण खातात . काहीजण वरणात टाकतात . चटनीने तोंडात चव येते.करवंदे आंबट असतात . त्यामुळे बाळंतीण बाईला देत नाही कारण आई व लेकरू (बाळ) दोघांनाही खोकला होतो.
करवंद हे उतार अन्न आहे . उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर ओषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या ,इंजेक्शन लागू पडत नाही.उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आहेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण (व्रण किंवा जखम) झाल्यास करवंद मुळीच खात नाही.
संदर्भ
[संपादन]पुस्तकाचे नाव - गोईन लेखीकेचे नाव -डॉ. राणी बंग