चर्चा:करवंद
या लेखस विकिकरण आवश्यक. अल्पमती १०:०९, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)
असंबद्ध मजकूर
[संपादन]येथे सापडलेला मजकूर योग्य बदल करुन इतरत्र हलवावा -- अभय नातू (चर्चा) १६:२२, १ ऑक्टोबर २०२३ (IST)
इतर माहिती गाव करवंद तालुका शिरपूर जि धुळे,महाराष्ट्र करवंद हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले समृद्ध गाव आहे.अरूनवती नदी आणि जवळपास असलेल्या सातपुडा पर्वत रांगा हे गावचे नैसर्गिक वैशिष्ट्य.करवंद गाव हे इतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव होते.येथे खान्देशातील साडेबारा रावल पैकी प्रतिहार/परिहार कुळातील राजपुतांनी वसवले.ज्यात त्यांनी अरुणावती नदी किनारी गढी बांधली आणि वेगवेगळ्या 12 बलुतेदारांना आणून कारभार सांभाळला.करवंद हे परगणे म्हणून ओळखले जात असे करवंद परगणे च्या अमलाखाली करवंद,मांडळ,शिरपूर, वरवाडे, कळमसरे,शिंगावे, वाघाडी,खरदे,उंटवाद, बाळदे,सावळदे ही गावे होती ह्या गावांचा कारभार रावल/राऊळ परिवार करवंद येथील गढी येथून पाहत असे.वरील नमूद केलेल्या गावांचे पाटील,देशमुख व इतर बारा बलुतेदार करवंद गढी येथे न्याय निवडा करण्यासाठी येत असत.रावल/राऊळ परिवाराची नाथ पंथामध्य आस्था असल्यामुळे रावल/राऊळ परिवाराच्या गढी परिसरात नाथ पंथाचा मठ आहे ज्यात वेगवेगळ्या साधूंनी वेगवेगळ्या कालावधी समाधी घेतल्याचे प्रमाण आहेत.गावापासून 1 कि.मी दूर गोरक्षनाथ महाराज मंदिर व साधूंची समाधी आहे. गावात वीरगळ,इतहासिक समाध्या,इतहासिक विष्णू मुर्त्या,गणेश मूर्ती,मंदिरे आढळतात यातून करवंद इतहासिक दृष्टीने खूप महत्त्वाचे होते असे समजते. वेगवेगळ्या राजवटीत राज्यकर्त्यांकडून करवंद गाव जिंकण्याचा प्रयत्न केले गेले कारण करवंद हे गाव उत्तेरतून दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर वसले आहे.सातपुडा पर्वत रंगांमधील बिजासनी मंदिर ते सेंधवा,मध्य प्रदेश रस्त्याला लागून असलेला भवरगढ किल्ला ते तापी नदीवरील सावळदे व्यापारी,मित्र सैन्य यांना योग्य कर घेऊन सुखरूप तापी नदीच्या पलीकडे सुरक्षित पोहचविण्याची जबाबदारी करवंद येथील रावल संस्थान कडे होती.हल्लीच्या मध्य प्रदेश व तत्कालीन माळवा ह्या प्रदेशातून दक्षिणेकडे जाणारी ही पहिली सैन्यचौकी (ठाणे) होते.म्हणून राजकीय दृष्ट्या करवंद गाव खूप महत्त्वाचे होते.होळकर राजवटीत अहिल्याबाई होळकर यांनी ह्याच गाव जवळ पायीविहिर बांधली आहे.ह्याच होळकर राजवटीतील शेवटचे राजे यशवंतराव होळकर ह्यांच्या संबंधित कागतपत्रे व तोफ,तलवारी,दगडी शिल्पं, भांडे,मुद्रा रावल/राऊळ परिवाराने सांभाळून ठेवले आहेत.