चटणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतानुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यांतले अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.

विविध चटण्या :

१) कैरी कांदा चटणी

साहित्य : २कांदे,१/२ वाटी कैरीचा किस,१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे,२ _ ३ चमचे तिखट,चवीप्रमाणे मीठ व गूळ,फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं हिंग

कृती : कांदे चिरून तेलावर परतावे .त्यात वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी .तेल मोहरीची फोडणी घालावी .

२) कैरीची चटणी

साहित्य : १ वाटी खोवलेला नारळ किंवा खोबर्याचा किस ,१/२ वाटी किसलेली कैरी,४_५ हिरव्या मिरच्या,कोथिंबीर ,आलं,१/२ चमचा जीरं , चवीप्रमाणे मीठ , आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर

कृती : वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .

३) चाट ग्रीन चटणी

१/४ वाटी कोथिंबीर, १/४ वाटी पुदिना, ३-४ हिरव्या लवंगी मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर १ टेबल स्पून, लिंबू रस. हे सर्व मिक्सरमधून काढा. ( मिरच्या कमी पण घेऊ शकता. शेवपुरी, पाणी पुरी यात टाकू शकता. आवडत असल्यास ब्रेड वर लावून सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकता..

४) कच्च्या टोमॅटोची चटणी

कच्च्या टोमॅटोच्या फोडी एक वाटी, ४-५ मिरच्या, चिमूटभर साखर/गूळ आवडत असल्यास, ओले खोबरे, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करून चटणी वाटा, आवडत असल्यास वरून फोडणी करा.

चटणीविषयी मराठी पुस्तके[संपादन]

  • आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
  • कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
  • चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
  • चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.