Jump to content

कमल रणदिवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमल रणदिवे
पूर्ण नावकमल जयसिंग रणदिवे
जन्म ८ नोव्हेंबर १९१७
मृत्यू ११ एप्रिल २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र जीवशास्त्र
पुरस्कार पद्मभूषण

कमल रणदिवे (कमल समर्थ) (इ.स. १९१७:पुणे - इ.स. २००१) या जीवशास्त्रज्ञ होत. त्यांचे एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले.

जीवन

[संपादन]

विवाहा नंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. येथेच त्यांनी पॅथॉलॉजिस्ट व्ही. आर. खानोलकर यांच्या सहयोगाने इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर या प्रयोगशाळेत पीएच.डी.चा अभ्यास केला. पीएच.डी.नंतर उच्चतम शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांनी भारतात परतले पाहिजे व स्वदेशात अधिकाधिक संशोधन करून देशाला त्याचा लाभ करून दिला पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. देशातील सर्वसामान्य, त्यातही तळागाळातल्या स्त्रिया व मुलं यांच्या उन्नतीसाठी शास्त्रज्ञांनी काम केलं पाहिजे, असं त्यांना मनापासून वाटे.

आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन

[संपादन]
  • त्यांनी अमेरिकेत उच्चशिक्षण घेतले तेथे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये जॉर्ज गे यांजबरोबर हेला नावाच्या पेशींवर काम केले.

कारकीर्द

[संपादन]

इ.स. १९६० मध्ये भारतात परतल्यानंतर भारतातील पहिले ‘पेशी संशोधन केंद्र’ इंडियन कॅन्सर संशोधन केंद्रात सुरू केले. प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र यात काम करणाऱ्या डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘कॅन्सर संशोधन केंद्र’ या संस्थेचे ‘भारतीय कॅन्सर संशोधन संस्था’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेत रूपांतर घडवले. या संस्थे मध्ये कॅन्सरचा कार्यकारणभाव, कॅन्सरच्या पेशींचा जीवनक्रम आणि कॅन्सरपासून अभय- अशा तीन नवीन उपशाखा विकसित करण्यात आल्या.

विशेष योगदान

[संपादन]

एखाद्या व्यक्तीची (प्राण्याची) कॅन्सर होण्याची प्रवृत्ती आणि त्याच्या शरीरात स्राव होणारे हार्मोन्स व टय़ूमर ऱ्हायरस यांचा परस्पर-संबंध शोधून उंदरावर प्रयोग करून तो पटवून देणाऱ्या त्या पहिल्या संशोधक ठरल्या. या संशोधनाचा उपयोग रक्ताचा (पांढऱ्या रक्तपेशी) कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि घशाचा कर्करोग यांच्या अभ्यासास उपयुक्त ठरला.

याचबरोबर त्यांचे महारोगाच्या जंतूवर काम चालूच होते. त्याचा उपयोग महारोगावरील लस (लेप्रसी व्हॅक्सीन) निर्माण करण्यास झाला.

संस्था

[संपादन]

स्त्री शास्त्रज्ञांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी ‘इक्सा’ (इंग्रजी : Indian Women Scientists Association) ही संस्था स्थापन केली.

पुरस्कार

[संपादन]

अधिक वाचन

[संपादन]

हेही पाहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://web.archive.org/web/20160304023832/http://archive.india.gov.in/myindia/padmabhushan_awards_list1.php?start=620