चर्चा:कबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील
१. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत.
२. कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत.
ही दोन वाक्ये खटकली. कबीराने कधी राम, कृष्ण, विठ्ठल, पांडुरंग यांच्यावर पदे केलेली आठवत नाहीत. जाणकारांनी लेखात काही चूक असेल तर सुधारणा कराव्यात.....J (चर्चा) २१:५२, २३ ऑक्टोबर २०१३ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:, या लेखात आंबेडकर साचा आपण लावला आहे. याचे कारण काय? हा दुवा पहा. तो साचा अनावश्यक वाटल्याने मी काढला आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:२३, २९ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: तो साचा अनावश्यक नाही, त्यात अगदी सुरुवातीलाच कबीरांचा उल्लेख आहे.--संदेश हिवाळेचर्चा १७:३२, २९ जून २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: म्हणजे या साच्यात जितके दुवे आहेत, त्या सगळ्या लेखात हा साचा लावायला हवा.उदा. नेपोलियन, आमिरखान इ. हा तर्क उचित आणि योग्य आहे का?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४५, २९ जून २०१८ (IST)

दुवे असणाऱ्या सर्वच लेखात साचा असावा असे नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त तीन गुरू होते, त्यापैकी एक कबीर. यांच्या लेखात साचा असावा, असे मत आहे. --संदेश हिवाळेचर्चा १८:३१, २९ जून २०१८ (IST)
या लेखात आंबेडकर साचा अनावश्यक आहे. वाटलेच तर आंबेडकर लेखात कबीर साचा (तयार करुन) लावावा. कबीरांचा आंबेडकरांवर प्रभाव होता, उलट नव्हे. -- अभय नातू (चर्चा) १९:४९, २९ जून २०१८ (IST)