कडापे
?कडापे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माणगाव, निजामपूर |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | मारुती महादेव मोकाशी |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०६ |
कडापे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
मौजे कडापे हे गाव सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्याच्या कुशीत वसलेला आहे. हे गाव रायगड (पूर्वी कुलाबा) जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात आहे. आजूबाजूला असलेला केळगणचा उंच कडा (डोंगर) असल्यामुळे या गावाला कडापे हे नाव पडले आहे. गावाच्या बाजूला काळ नदीचे पात्र आहे. १५ किलोमीटर अंतरावर उंबर्डीघाट आणि किल्ले कुर्डुगड तर ४ किलोमीटर अंतरावर मानगड हा किल्ला आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]१. बापूजीबुवा आणि कालिकामाता देवस्थान संस्था कडापे.
२. प्राचीन महादेव मंदिर
३. रगतबाव
४. कडापे कोंड (धबधबा)
५. चौरस विहीर
६. प्राचीन विरगळी
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]१. मालुस्ते २. येरद ३. कडापेवाडी ४. शिरसाड ५. केळगण (कामातवाडी) ६. चाच ७. शिरवली