Jump to content

कंचनजंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कञ्चनजंघा या पानावरून पुनर्निर्देशित)
कांचनगंगा
center}}
चौदा फेरी, सिक्कीममधून कांचनगंगा
कांचनगंगा is located in नेपाळ
कांचनगंगा
कांचनगंगा
कांचनगंगा शिखराचे भारत-नेपाळ सीमेजवळील स्थान
उंची
२८,१६९ फूट (८,५८६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
नेपाळ लिंबूवन, नेपाळ
भारत सिक्कीम, भारत
पर्वतरांग
हिमालय
गुणक
27°42′09″N 88°08′54″E / 27.70250°N 88.14833°E / 27.70250; 88.14833
पहिली चढाई
२५ मे १९५५
युनायटेड किंग्डम जो ब्राउन
युनायटेड किंग्डम जॉर्ज बँड
सोपा मार्ग
साउथ कोल


कांचनगंगा (नेपाळी: कञ्चनजङ्घा) हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्टके२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते.

भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.

कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला मानांकित ठरला आहे.

कांचनगंगा त्रिमितीय

कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत.

शिखराचे नाव उंची मीटरमध्ये फूट
कांचनगंगा ८,५८६ २८,१६९
कांचनगंगा पश्चिम Yalung Kang ८,५०५ २७,९०४
कांचनगंगा मध्य ८,४८२ २७,८२८
कांचनगंगा दक्षिण ८,४९४ २७,८६७
कांगबाचेन ७,९०३ २५,९२५
दार्जिलिंगमधून कांचनगंगा पर्वतरांग
कांचनगंगा, अजून एक दृश्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: