कजरा रे (हिंदी गीत)
"कजरा रे" | |
---|---|
ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे या गाण्यात दिसतात | |
कव्वाली गीत by अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली | |
from the album बंटी और बबली (२००५) | |
भाषा | हिंदी |
Released | २००५ |
Studio | यश राज म्युझिक |
गाण्याची शैली | गझल, कव्वाली, चित्रपट गीत |
रेकॉर्डिंग कंपनी | यश राज म्युझिक |
Composer(s) | शंकर-एहसान-लॉय |
Lyricist(s) | गुलजार |
निर्माते |
|
कजरा रे (अनुवाद: काजळासारखे गडद (डोळे)) हे शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले एक गाणे आहे, जे गुलजार यांनी लिहिले आणि अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी गायले आहे. २००५ च्या बंटी और बबली चित्रपटातील हे गाणे आहे, ज्यात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी भूमिका केल्या होत्या. यात अमिताभ आणि अभिषेक एका नाईट क्लबमध्ये आहेत आणि ऐश्वर्या राय, चित्रपटात एक विशेष भूमिका साकारत आहे, अमिताभसाठी गाते, आणि तिच्यासोबत अभिषेक गायन आणि नृत्यात सामील होतो.[१]
हे गाणे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. तसेच भारतीय संगीत चार्टवर प्रचंड यशस्वी झाले.[२] हिंदुस्तान टाइम्सने "शंकर-एहसान-रॉय आणि गुलजार यांच्या कव्वालीचा पुनर्शोध" असे वर्णन केले आणि या गाण्याला "दशकातील अव्वल आयटम गीत" म्हणले.[३] प्लॅनेट बॉलीवूडने आयोजित केलेल्या सर्वेक्षणातही ते वर्षातील गाणे म्हणून तब्बल ४४% मतांनी जिंकले.[४]
दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय असलेल्या लोटस एफएम या स्टेशनसह तीन रेडिओ स्टेशन्सद्वारे हे "वर्षातील सर्वोत्तम गाणे" म्हणून निवडले गेले.[५] हे गाणे हिंदुस्तान टाइम्सच्या "शतकातील सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये" निवडले गेले, ज्यामध्ये या गाण्याला "दशकातील निर्विवाद आयटम साँग" मानले होते.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ Beaster-Jones, Jayson (2014-10-09). Bollywood Sounds: The Cosmopolitan Mediations of Hindi Film Song (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-999348-2.
- ^ Jun 28, Priyanka Dasgupta / TNN /; 2005; Ist, 20:30. "Second coming | undefined News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "From Melody to Dev D - Hindustan Times". web.archive.org. 2010-12-04. 2010-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.
- ^ "planet bollywood". 2019-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.
- ^ "OTT | TV | Bollywood | Hollywood - News, Reviews, Gossips..." (इंग्रजी भाषेत). 2021-08-07. 2022-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Songs of the Century - Hindustan Times". web.archive.org. 2012-08-04. 2012-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.