काजळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   सुवासिनींमध्ये सणासुदीला मुद्दाम काजळ घालण्याची एक पद्धत आहे. डोळयांचे एक सौंदर्यप्रसाधन आहे. पुरातन काळापासून डोळयांत काजळ किंवा अंजन घालण्याची प्रथा आढळते. काजळ घातल्याने डोळे सतेज, कोरीव/ रेखीव व आकर्षक दिसतात तसेच डोळ्यांना थंडावा मिळतो.. विशेषतः स्त्रिया काजळ घालतात.
          प्रथाही दिसून येते. काजळाप्रमाणे सुरमा नावाचा पदार्थ विशेषतः मुसलमान स्त्रिया व पुरुष वापरतात. काजळाप्रमाणे अनेक प्रकारची नेत्रांजनेही आहेत; त्यामुळे डोळे चुरचुरतात व पाणी येऊन स्वच्छ होतात. काजळाशी अशुभनिवारणाचा संकेतही निगडित असल्याचे दिसून येते.

लहान मुलाला काजळाचे गालबोट लावतात. काजळ तयार करण्याची कृती सुश्रुतसंहितेत आढळते. सामान्यतः एरंडेलाच्या किंवा तुपाच्या ज्योतीवर तांब्याचे भांडे पालथे धरून काजळी धरतात. ती लोण्यात कालवून काजळ बनवितात.