चर्चा:उमर अब्दुल्ला
इंग्रजीमध्ये उ या उच्चाराने सुरू होणारे शब्द बहुधा नसावेत. त्यामुळे देशी नावांमधील सुरुवातीला येणाऱ्या 'उ' अक्षराचे अस्सल इंग्रजी स्पेलिंग 'ओ' होते. ते 'यू'ने केले तर त्याचा उच्चार Up मधील 'यू'चा होतो तसा 'अ्' होतो. उदा० उमर खय्याम, उस्मान, उमरखाडी, उस्मानाबाद, उमरगाव, उमरावती, यांची स्पेलिंगे अनुक्रमे Omer Khayyam, Osman, Omarkhadi. Osmanabad, Omergaum, Omrawati अशी होतात. त्यामुळे Omer Abdullaचे मराठी लेखन उमर अब्दुल्ला होते.
उमरावतीचे स्पेलिंग Umrawati केल्याने त्या गावाचे नावच बदलले आणि अमरावती झाले. मुहंमद असाच मोहम्मद होतो. मुंबई Bombay होते.. मुसुंबे Mosumbेेेेe (मोसंबे) होते. मुरारजी देसाई हे मोरारजी देसाई होतात. मुग़ल मोगल होतात. शब्दकोशात दिल्याप्रमाणे 'moslim m (plural moslims, diminutive moslimmetje n , feminine moslima) Muslim; a Muslim person, adherent to Islam Synonyms: islamiet, mohammedaan, muzelman'.
मराठीतल्या उषा, ऊर्मिला, उर्वशी यांची स्पेलिंगेही 'ओ'ने सुरू व्हायला हवी होती. ....ज (चर्चा) १६:४२, २१ सप्टेंबर २०१९ (IST)