ओखोत्स्कचा समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओखोत्स्कच्या समुद्राचे स्थान

ओखोत्स्कचा समुद्र (रशियन: Охо́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. ह्या समुद्राच्या पूर्वेस रशियाचा कामचत्का द्वीपकल्प, नैऋत्येस साखालिन बेट, आग्नेयेस कुरिल द्वीपसमूह, उत्तर व पश्चिमेस सायबेरिया तर दक्षिणेस जपानचे होक्काइदो हे बेट स्थित आहेत. तार्तर सामुद्रधुनीला पेरूज सामुद्रधुनी हे दोन जलाशय ओखोत्स्क समुद्राला जपानच्या समुद्रासोबत जोडतात.

मागादान ओब्लास्तमधील मागादान हे ह्या समुद्रावरील सर्वात मोठे शहर व बंदर आहे.