ओखोत्स्कचा समुद्र
Appearance
ओखोत्स्कचा समुद्र (रशियन: Охо́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. ह्या समुद्राच्या पूर्वेस रशियाचा कामचत्का द्वीपकल्प, नैऋत्येस साखालिन बेट, आग्नेयेस कुरिल द्वीपसमूह, उत्तर व पश्चिमेस सायबेरिया तर दक्षिणेस जपानचे होक्काइदो हे बेट स्थित आहेत. तार्तर सामुद्रधुनी व ला पेरूज सामुद्रधुनी हे दोन जलाशय ओखोत्स्क समुद्राला जपानच्या समुद्रासोबत जोडतात.
मागादान ओब्लास्तमधील मागादान हे ह्या समुद्रावरील सर्वात मोठे शहर व बंदर आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत