ए.के. हंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए.के. हंगल
ए.के. हंगल
जन्म अवतार किशन हंगल
१ फेब्रुवारी इ.स. १९१७
सियालकोट, पाकिस्तान
मृत्यू २६ ऑगस्ट इ.स. २०१२
आशा पारेख रुग्णालय, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६५-इ.स. २००५
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट नमक हराम, शोले, शौकीन, आइना
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कलर्स या वाहिनीवरील "'मधुबाला
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार(इ.स. २००६)
वडील किशन
अपत्ये विजय हंगल

अवतार किशन हंगल ( इ.स. १९१५ - ऑगस्ट २६, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते होते. हंगल यांना २००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नमक हराम', 'शोले', 'शौकीन', 'आइना' असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली, त्यांनी कलर्स या वाहिनीवरील मधुबाला या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यांना त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी पद्मभूषण या सन्मानानी गौरवण्यात आले होते . स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. पाकिस्तानात दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १९४९ साली ते मुंबईत आले. हौशी रंगभूमीवर काम करीत असलेले हंगल यांना चित्रपटांमधून काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट जगतात यावे लागले. रंगभूमीशी जवळीक असणा-या हंगल यांनी अनेक नाटकं लिहून त्यामध्ये भूमिकाही केल्या आहेत. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी ते फार पूर्वीपासून जोडलेले होते.

कारकीर्द[संपादन]

हंगल यांचे लहानपण पेशावर येथे गेले. अभिनयाचा छंद त्यांना लहानपणा पासूनच होता. हंगल यांनी आपली अभिनय कारकीर्द वयाच्या ५० व्या वर्षी सुरू केली. वर्ष १९६६ मध्ये बासू भट्टाचार्य ह्यांच्या तिसरी कसम ह्या चित्रपटात ते प्रथम पडद्यावर दिसले. त्या नंतर मात्र त्यांनी एक उत्कृष्ट चरित्र अभिनेता अशी ख्याती मिळवली. त्यांची रामू काका ही भूमिका अतिशय प्रसिद्ध आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा मुलगा असूनही आपल्या विडीलाच्या इच्छे विरुद्ध त्यांनी शिप्याचे काम करण्याचे ठरवले. इंग्लंड येथे प्रशिक्षित एका शिंप्याकडून त्यांनी ५०० रुपये गुरुदक्षिणा देऊन शिवणकामाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. हंगल हे उत्तम शिंपी होते.

आत्मचरित्र[संपादन]

द लाइफ अ‍ॅण्ड टाइम ऑफ ए. के. हंगल हे त्यांचे आत्मचरित्र इंग्रजीत प्रसिद्ध झाले आहे.

पुरस्कार[संपादन]

त्यांना त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी भारत सरकारच्या पद्मभूषण या सन्मानानी इ.स. २००६ मध्ये गौरवण्यात आले.

प्रमुख चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट चरित्र टिप्पणी
१९८२ श्रीमान श्रीमती विश्वनाथ गुप्ता
१९८० हम पॉंच पंडित
१९८० फ़िर वही रात विश्वनाथ
१९८० जुदाई नारायण सिंह
१९८० काली घटा दीवान
१९७९ मीरा संत रईदास
१९७९ खानदान मास्टरजी, ऊषा का पिता
१९७८ देस परदेस पुजारी
१९७८ नौकरी रंजीत का पिता
१९७८ सत्यम शिवम सुन्दरम बंसी, रूपा का चाचा
१९७८ बदलते रिश्ते प्रोफेसर
१९७८ स्वर्ग नर्क गीता का पिता
१९७८ तुम्हारे लिये भवानी
१९७८ बेशरम रामचंद्र
१९७७ मुक्ति कर्नल
१९७७ आइना राम शास्त्री
१९७७ ईमान धर्म मास्टरजी, श्यामली का पिता
१९७७ पहेली मास्टरजी
१९७७ कलाबाज़ पुजारी
१९७७ आलाप पंडित जमुना प्रसाद (अतिथि पात्र)
१९७६ ज़िन्दगी डॉक्टर
१९७६ चितचोर पीतांबर चौधरी
१९७६ बालिका बधू मास्टरजी
१९७६ तपस्या चंद्रनाथ सिन्हा
१९७५ ऑंधी बृंदा काका
१९७५ शोले इमाम साहब/रहीम चाचा
१९७५ दीवार चंदर के पिता
१९७५ अनोखा हृदयनाथ
१९७५ सलाखें रामलाल, सीमा का पिता
१९७४ विदाई रामशरण
१९७४ दूसरी सीता
१९७४ कोरा कागज़ प्रिंसिपल गुप्ता
१९७४ आप की कसम कमल के पिता
१९७४ इश्क इश्क इश्क गुरुजी
१९७३ नमक हराम बिपिनलाल पांडे
१९७३ जोशीला लाला गुलजारीलाल
१९७३ अभिमान सदानंद
१९७३ छुपा रुस्तम प्रोफ़ेसर हरबंसलाल
१९७३ अनामिका शिव प्रसाद
१९७३ दाग वकील/जज
१९७३ हीरा पन्ना दीवान करणसिंह
१९७२ परिचय रवि का मामा
१९७२ जवानी दिवानी कॉलेज प्राध्यापक
१९७२ बावर्ची रामनाथ शर्मा (मुन्ना)
१९७१ अनुभव हरी
१९७१ नादान सीमा के पिता
१९७१ मेरे अपने कॉलेज प्राध्यापक
१९७१ गुड्डी गुड्डी के पिता
१९६९ सारा आकाश ठाकुर
१९६९ सात हिन्दुस्तानी डाक्टर
१९६७ तीसरी कसम
१९६७ शागिर्द केदारनाथ बद्रीनारायण

बाह्य दुवे[संपादन]