राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी , NCERT , इंग्लिश: National Council of Educational Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे., [१] शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली.
स्थापना- इ. स. 1 सप्टेंबर १९६१
याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे
ब्रीदवाक्य- विद्या मृतमश्नुते (life eternal through learning)
उद्दिष्टे
[संपादन]भारतीय शिक्षणाची राष्ट्रीय परीषद (एनसीआयई) व राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे:
- राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे
- प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई)
- व्यावसायिक शिक्षण
- विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण
- शिशु शिक्षण
- माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान
- स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण
- बालिका शिक्षण
- अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे
- अध्यापन शिक्षणामध्ये सुधार
. रचना ==
अध्यक्ष (केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री), सदस्य - विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागांतील विद्यापीठांपैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव इ.
कामाचे स्वरूप
[संपादन]- शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे,
- विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यामध्ये विस्तार सेवा पुरवणे,
- शिक्षणविषयक माहिती ज्ञान यांचा प्रसार करणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके व साहित्य व प्रकाशनाची कार्य करणे.
उपसंस्था
[संपादन]- पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ ही संस्था व्यावसायिक व कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन, प्रशिक्षण विकास व विस्तार कार्यक्रम राबवते.
- राष्ट्रीय शिक्षण संस्था, दिल्ली - ही 'एनसीइआरटी'ची सर्वात प्रमुख संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. उदा. शालान्तपूर्व व प्राथमिक शिक्षा विभाग, विज्ञान व गणित शिक्षण विभाग शिक्षणविषयक मूल्यमापन विभाग, संगणक शिक्षण व तांत्रिक साधने विभाग इ.
- केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, दिल्ली - शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे उदा. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आदींच्या साहाय्याने शिक्षण प्रचार व प्रसार करणे. या संस्थेने सहा राज्यांमध्ये राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केलेल्या आहेत (महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा व उत्तर प्रदेश) या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालवले जाते, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या साहाय्याने हा कार्यक्रम चालवला जातो.
प्रकाशने
[संपादन]एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसईची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते.प्रकाशनासाठी 'एनसीइआरटी'ची तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत- अलाहाबाद, [[कोलकta, बंगळुरू. प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केली जातात. तसेच 'एनसीइआरटी' - द सायन्स टीचर, द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन प्रकाशित करते
आणखी पाहा
[संपादन]- NCERT controversy
- Regional Institute of Education
- National Curriculum Framework (NCF 2005)
- विद्यापीठ अनुदान आयोग
संदर्भ
[संपादन]- ^ "एनसीईआरटी जाहीर माहिती सेवा." National Council of Educational Research and Training. Retrieved on 25 August 2012. "National Council of Educational Research and Training," Sri Aurbindo Marg, New Delhi-110016"
बाह्यदुवे
[संपादन]- NCERT Homepage
- Online Textbooks by NCERT
- NCERT Books Archived 2021-04-22 at the Wayback Machine.