राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी , NCERT , इंग्लिश: National Council of Educational Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे., [१] शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली.

स्थापना- इ. स. 1 सप्टेंबर १९६१

याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे

ब्रीदवाक्य- विद्या मृतमश्नुते (life eternal through learning)

उद्दिष्टे[संपादन]

भारतीय शिक्षणाची राष्ट्रीय परीषद (एनसीआयई) व राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे:

 1. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे
 2. प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई)
 3. व्यावसायिक शिक्षण
 4. विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण
 5. शिशु शिक्षण
 6. माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान
 7. स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण
 8. बालिका शिक्षण
 9. अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे
 10. अध्यापन शिक्षणामध्ये सुधार
  . रचना ==

अध्यक्ष (केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री), सदस्य - विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागांतील विद्यापीठांपैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन खात्याचे सचिव इ.

कामाचे स्वरूप[संपादन]

 1. शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे,
 2. विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यामध्ये विस्तार सेवा पुरवणे,
 3. शिक्षणविषयक माहिती ज्ञान यांचा प्रसार करणे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे, शिक्षणासंदर्भात पुस्तके, नियतकालिके व साहित्य व प्रकाशनाची कार्य करणे.

उपसंस्था[संपादन]

 • पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ ही संस्था व्यावसायिक व कार्यानुभव शिक्षणामध्ये संशोधन, प्रशिक्षण विकास व विस्तार कार्यक्रम राबवते.
 • राष्ट्रीय शिक्षण संस्था, दिल्ली - ही 'एनसीइआरटी'ची सर्वात प्रमुख संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. उदा. शालान्तपूर्व व प्राथमिक शिक्षा विभाग, विज्ञान व गणित शिक्षण विभाग शिक्षणविषयक मूल्यमापन विभाग, संगणक शिक्षण व तांत्रिक साधने विभाग इ.
 • केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, दिल्ली - शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे उदा. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आदींच्या साहाय्याने शिक्षण प्रचार व प्रसार करणे. या संस्थेने सहा राज्यांमध्ये राज्य शिक्षण तंत्रज्ञान संस्था स्थापन केलेल्या आहेत (महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसाउत्तर प्रदेश) या संस्थेमार्फत केंद्रीय चित्रपट ग्रंथालय चालवले जाते, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या साहाय्याने हा कार्यक्रम चालवला जातो.

प्रकाशने[संपादन]

एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसईची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते.प्रकाशनासाठी 'एनसीइआरटी'ची तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत- अलाहाबाद, [[कोलकta, बंगळुरू. प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केली जातात. तसेच 'एनसीइआरटी' - द सायन्स टीचर, द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन प्रकाशित करते

आणखी पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "एनसीईआरटी जाहीर माहिती सेवा." National Council of Educational Research and Training. Retrieved on 25 August 2012. "National Council of Educational Research and Training," Sri Aurbindo Marg, New Delhi-110016"

बाह्यदुवे[संपादन]

साचा:भारतातील शालेय शिक्षण