उमळवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उमळवाड [English: Umalwad] हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील गाव आहे. ते जयसिंगपूर शहरापासून ५ किमी अंतरावर असून या गावाची लोकसंख्या २०११ च्या शिरगणतीनुसार ५०३५ [१] आहे. येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव भरतो. हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसेलेले असून येथे दानलिंग महाराजांचे संजीवनी समाधी स्थळ आहे.

बोली भाषा[संपादन]

उमळवाडमध्ये प्रामुख्याने मराठी बोलली जाते. काही प्रमाणात कानडी भाषाही बोलली जाते. ग्रामपंचायतीचे आणि तलाठी कार्यालयाचे कार्य मराठीतूनच चालते.

उमळवाड मधील शासकीय व वैद्यकीय सुविधा[संपादन]

उमळवाडमध्ये एक सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे. गावात एक तलाठी कार्यालय आहे. उमळवाडचे कामकाज तेथील ग्रामपंचायत चालवते.

कसे पोहोचायचे?[संपादन]

उमळवाडसाठी दर अर्ध्या तासाला एस टी महामंडळाच्या बसेस जयसिंगपूरहून सुटतात. खाजगी रिक्षानेही जाता येते. उमळवाडपासून जयसिंगपूर रेल्वे स्टेशन २.३ किमी अंतरावर आहे. उमळवाडपासून तालुक्याचे गाव शिरोळ १०. किमी अंतरावर, जवळचे रेल्वे जंक्शन मिरज १०. किमी अंतरावर तर जिल्ह्याचे शहर कोल्हापूर ४२.५ किमी अंतरावर आहे.

उमळवाडमध्ये साजरे केले जाणारे उत्सव[संपादन]

उमळवाडमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला श्री दानलिंग महाराजांची यात्रा भरते. ही यात्रा ५ दिवस चालते. या यात्रेसाठी खूप दूरवरून भाविक येतात. बिरदेवाची यात्राही दरवर्षी भरते. गावात महावीर जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हनुमान जयंती, बसवेश्वर जयंती, नाताळ इत्यादी उत्सव साजरे होतात.

उमळवाडमधील शैक्षणिक सुविधा[संपादन]

उमळवाड मध्ये ६ अंगणवाड्या आहेत. दोन सरकारी प्राथमिक मराठी शाळा आहेत, पहिली कन्या विद्या मंदिर आणि दुसरी कुमार विद्या मंदिर. ८ वी ते १० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थी श्री दानलिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात. या हायस्कूलमधून दहावीला बोर्डात चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.

ग्रामपंचायत उमळवाड[संपादन]

ग्रामपंचायत ची स्थापना … मध्ये झाली असून दर पाच वर्षांनी सरपंचपदाची निवडणूक होते. ग्रामपंचायतीचे १३ प्रभाग असून १३ प्रतिनिधी दर ५ वर्षांनी निवडून येतात. फोन नं. - (०२३२२) २४०१३६

ग्रामपंचायत बोडी (इ.स. २०१६)

 • सरपंच- श्रीमती मनीषा राजगोंडा पाटील
 • उपसरपंच- श्री. सुभाष आण्णा पाटील
 • सदस्य- श्री. महेश शिवाजी तिवडे
 • सदस्य- सौ. अलका कल्लाप्पा कांबळे
 • सदस्य- श्री. भाऊसो दादू ठोंबरे
 • सदस्य- सौ. सुवर्णा शामराव कुऱ्हाडे,
 • सदस्य- सौ. कांचन मदन संकपाळ,
 • सदस्य- श्री. महावीर बाबू चव्हाण,
 • सदस्य- सौ. सुवर्णा बाळासो चौगुले,
 • सदस्य- श्री. अभयकुमार रामा कोळी,
 • सदस्य- राणी आकाराम ठोंबरे,
 • सदस्य- श्री. बापू मल्लू कांबळे,
 • सदस्य- सौ. रेखा रवींद्र तिवडे
 • ग्रामसेवक- बहिरू नामदेव टोणे, मोबा. ९८६०१०७८०१
 • क्लार्क- सतीश भीमराव तिवडे मोबा.-८८८८५५४६१३
 • डाटा ऑपरेटर- शहानवाज अकबर घुणके मोबा.- ९७६६७८६९६८

उमळवाड मधील दवाखाने[संपादन]

उमळवाड मध्ये ५ खाजगी दवाखाने आहेत.

 • सेरा क्लिनिक, डॉ. इर्शाद नदाफ, बी.एच.एम.एस, मोबा. ९८८१८१४०११
 • डॉ. पवन मगदुम्, बी.एच.एम.एस
 • डॉ. सुतार, बी.एच.एम.एस
 • डॉ. अमोल पाटील, बी.एच.एम.एस, (२४ तास सेवा)
 • डॉ. जे.जे. समजन्नावर, बी.एच.एम.एस, (२४ तास सेवा)

मेडीकल[संपादन]

 • आवटी मेडीकल, वेळ- सकाळी ९ ते १२, संध्या. ६ ते ९

दुध संकलन केन्द्रे[संपादन]

 • विश्वशक्ती सहकारी दुध संस्था, उमळवाड, संकलन म्हैस- १३६ लि. , गाय- ४५० लि. पर दिवस

चेअरमन- रेवणजी चौगुले

 • अहिंसा दुध संकलन केंद्र, उमळवाड, संकलन- म्हैस... लि. , गाय-...लि. पर दिवस
 • स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक व व्यावसाईक संस्था मर्यादित, उमळवाड, संकलन- म्हैस... लि. , गाय-...लि. पर दिवस
 • श्री हनुमान दुध उत्पादक व व्यावसाईक संस्था, उमळवाड संकलन- म्हैस ८० लि. , गाय-१०० लि. पर दिवस

चेअरमन- रविंद्र चौगुले

बँक[संपादन]

विश्वशक्ती सहकारी ग्रामीण पतसंस्था मर्यादित, उमळवाड


मंदिरे[संपादन]

 • श्री दानलिंग महाराज मंदिर
 • श्री रामलिंग मंदिर
 • श्री हनुमान मंदिर
 • श्री बसवेश्वर मंदिर
 • श्री बिरदेव मंदिर

भजनी मंडळे[संपादन]

श्रीराम भजनी मंडळ, उमळवाड

संपर्क-

 • श्री. देवगोंडा चिपरगे, मोब.- ९३७३६६९६६०
 • श्री. बबन कांबळे, मोब.- ९९२२७७२६०२
 • सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले, मोब.- ८६००४१०९७५

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, उमळवाड च्या अंतर्गत हे भजनी मंडळ असून उमळवाड मधील सर्वात जुने भजनी मंडळ आहे. या मंडळाची स्थापना होऊन ३० वर्षांहून जास्त वर्षे झाली आहेत.


 • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष- श्री. शंकर दादू चौगुले
 • श्रीराम भजनी मंडळाचे प्रमुख- श्री. देवगोंडा चिपरगे

चौकट|मध्यवर्ती|श्रीराम भजनी मंडळाचे प्रमुख- श्री. देवगोंडा चिपरगे या भजनी मंडळामध्ये स्त्री पुरुष मिळून २० सदस्य आहेत. २० जणांमध्ये ६ स्त्रिया आणि बाकीचे पुरुष आहेत. सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले मुख्य गायिका आहेत.

सदस्य

 • मुख्य गायिका- सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले
 • गायिका- श्रीमती कल्पना आप्पासो गुरव
 • गायक- श्री. प्रमोद जोती माने
 • हार्मोनियम- श्री. बबन कांबळे
 • तबला- श्री. शंकर दादू चौगुले
 • कारकुट- श्री. लक्ष्मण आवळे
 • डिमडी- श्री. हरी बाबू लोंढे

इतर सदस्य

 • श्री. भुपाल चव्हाण
 • श्री. रामगोंडा पाटिल
 • श्री. बाळासो मगदुम
 • श्री. सुभाष ठोंबरे
 • सौ. महादेवी कुंभार
 • श्रीमती सुनंदा मगदूम
 • सौ. पुष्पा पाटील
 • सौ. रेखा गाडवे
मुख्य गायिका- सौ. कल्पना चंद्रशेखर चौगुले


वैशिष्ट

या भजनी मंडळाचे वैशिष्ट असे आहे कि हे भजनी मंडळ हरिभजन, जिनभजन, दत्तपंथी, शिवभजन असे भजनाचे बरेच प्रकार सादर करते. आजपर्यंत या भजनी मंडळाने कारंदवाडी, सांगली, शिरोळ , इचलकरंजी, नागाव, जयसिंगपूर, कोथळी, अंकली, अर्जुनवाड ई. गावांमध्ये भजने सादर केली आहेत.

 • आमचे भजन

संदर्भ[संपादन]

 1. ^ "उमळवाड जनगणना" (इंग्रजि मजकूर).