Jump to content

उमळवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उमळवाड [English: Umalwad] हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील गाव आहे. ते जयसिंगपूर शहरापासून ५ किमी अंतरावर असून या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५०३५ [] आहे. येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव भरतो. हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसेलेले असून येथे दानलिंग महाराजांचे संजीवनी समाधी स्थळ आहे.

बोली भाषा

[संपादन]

उमळवाडमध्ये प्रामुख्याने मराठी बोलली जाते. काही प्रमाणात कानडी भाषाही बोलली जाते. ग्रामपंचायतीचे आणि तलाठी कार्यालयाचे कार्य मराठीतूनच चालते.

उमळवाड मधील शासकीय व वैद्यकीय सुविधा

[संपादन]

उमळवाडमध्ये एक सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे. गावात एक तलाठी कार्यालय आहे. उमळवाडचे कामकाज तेथील ग्रामपंचायत चालवते.

कसे पोहोचायचे?

[संपादन]

उमळवाडसाठी दर अर्ध्या तासाला एस टी महामंडळाच्या बस जयसिंगपूरहून सुटतात. खाजगी रिक्षानेही जाता येते. उमळवाडपासून जयसिंगपूर रेल्वे स्थानक २.३ किमी अंतरावर आहे. उमळवाडपासून तालुक्याचे गाव शिरोळ १०. किमी अंतरावर, जवळचे रेल्वे जंक्शन मिरज १०. किमी अंतरावर तर जिल्ह्याचे शहर कोल्हापूर ४२.५ किमी अंतरावर आहे.

उमळवाडमध्ये साजरे केले जाणारे उत्सव

[संपादन]

उमळवाडमध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला श्री दानलिंग महाराजांची यात्रा भरते. ही यात्रा ५ दिवस चालते. या यात्रेसाठी खूप दूरवरून भाविक येतात. बिरदेवाची यात्राही दरवर्षी भरते. गावात महावीर जयंतीसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हनुमान जयंती, बसवेश्वर जयंती, नाताळ इत्यादी उत्सव साजरे होतात.

उमळवाडमधील शैक्षणिक सुविधा

[संपादन]

उमळवाड मध्ये ६ अंगणवाड्या आहेत. दोन सरकारी प्राथमिक मराठी शाळा आहेत, पहिली कन्या विद्या मंदिर आणि दुसरी कुमार विद्या मंदिर. ८ वी ते १० वी पर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थी श्री दानलिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात. या हायस्कूलमधून दहावीला बोर्डात चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "उमळवाड जनगणना" (इंग्रजि भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)