Jump to content

उमरणी बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?उमरणी बुद्रुक

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अक्राणी
जिल्हा नंदुरबार जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/३९

उमरणी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]
  1. धडगाव तालुक्याच्या उत्तरेला आहे.

हवामान

[संपादन]

येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मिमी पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.

==लोकजीवन== प्रामुख्याने आदिवासी पावरा अंदाजे 90% आणि काही भिल्ल आणि इतर समाजाची लोकसंख्या 10% आहे. पावरी ही बोली बोलली जाते. आदिवासी समाज कृषिप्रधान असल्याने कृषी आणि संलग्न व्यवसाय चालतात. आदिवासी होळी, इंदल आणि निलपी पूजन ,नवाय आणि बैल पोळा इत्यादी सण उत्साहाने साजरी केली जातात. आदिवासींचा पेहराव महिला नाटी (लुगडं) आणि पुरुष बंडी आणि धोतर नेसतात. प्रत्येक गावात गाव पुजारा आणि महाराज (वैद्य) असतो. पुजारा आणि वैद्य यांना खूप आदराचे स्थान असते.

==प्रेक्षणीय स्थळे== उमराणी गावाच्या उत्तरेला सातपुडा पर्वताची उमराणी-तिनसमाळ ही पर्वत रांग आहे. तिथून अनेक अक्राणी पर्वत रांगा दिसतात.

==नागरी सुविधा= उमराणी बुद्रुक गावाला स्वतंत्र्य ग्रामपंचायत आहे. जिल्हा परिषद शाळा आहे. मुख्य रस्त्याला जोडणी आहे.

जवळपासची गावे

[संपादन]
  1. उत्तरेला ईशान्य भागात खुटवडा दक्षिण नैऋत्येला धनाजे आणि भोगवाडे ही गावं आहेत. पूर्वेला उमराणी खुर्द आणि वायव्य दिशेला आमला व आचपा ही गावं आहेत. तसेच धडगाव शहर तालुक्याचे ठिकाण सुमारे 3-7 किमी आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.